मुंबई - Vignesh Shivan shoots with MS Dhoni : अभिनेत्री नयनताराचा पती आणि साऊथमधील प्रथितयश दिग्दर्शक विघ्नेश शिवन हा एक क्रिकेट प्रेमी आहे आणि त्यानं अलीकडेच माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यानं धोनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकत एमएस धोनीला आपला 'आयडॉल' आणि 'रोल मॉडेल' असल्याचं सांगितलं.
मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम फोटो शेअर करताना, विघ्नेश शिवनने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'मला सर्वात जास्त काय आवडत असेल तर, दिग्दर्शन करणं आणि माझ्या आयडॉलला अॅक्शन म्हणणं. हा एक असा तारा आहे जो वर्णनाच्या पलिकडचा आहे आणि रोल मॉडेल म्हणून मी ज्याच्याकडे खरोखर पहातो. कॅप्टन कूल.' विघ्नेशनं असं लिहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रियांचा वर्षाव केलाय. एकानं लिहिलंय की, 'आता हा महान व्यक्ती त्याच्यासोबत शुटिंग करतोय याचा जास्त आनंद होतोय.' दुसऱ्यानं लिहिलं की, 'एका फ्रेममध्ये माझे दोन आवडते पीपीएल.'
विघ्नेश शिवननं यापूर्वी एमएस धोनीकडून ऑटोग्राफ घेतल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यानं धोनीचं मनापासून आभार मानत विघ्नेशनं लिहिलं होतं, माझा कर्णधार, माझा आदर्श, माझ्या हिरोसोबत! याच्या पुढे असणे नेहमीच भावनिक आणि जबरदस्त असतं. माही एक माणूस आहे ज्याच्यावर मी खूप प्रेम करतो आणि प्रत्येक दिवसाकडे पाहतो! दर वेळी जेव्हा मी त्याला पाहतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात असतो. व्हिडिओमध्ये क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी विघ्नेश शिवनच्या पांढऱ्या टी-शर्टवर सही करताना दिसत आहे.
तमिळ चित्रपट उद्योगात एक निर्माता म्हणून पदार्पण केल्याबद्दल विघ्नेश शिवननं महेंद्र सिंग धोनीचं आभार मानलं. अनेक चित्रपटांच निर्मिती करण्याच्या उद्देशानं धोनीचं प्रॉडक्शन हाऊस काम करणार आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी सिंग यांनी 'लेट्स गेट मॅरीड' या तमिळ चित्रपटाची निर्मिती अलिकडेच केली आहे. 28 जुलै 2023 रोजी रिलीज झालेला हा चित्रपट रमेश थमिलमनी यांनी दिग्दर्शित केला होता. यात हरीश कल्याण, इवाना, नाधिया आणि योगी बाबू प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा -