ETV Bharat / entertainment

4 Blind Men एक हत्ती आणि चार आंधळे या प्रसिद्ध बोधकथेवर आधारित मराठी चित्रपट - Directed by Abhishek Merukar

चक्रधर स्वामींनी एक हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट सांगितली आहे. चार आंधळे हत्ती पाहायला गेले. प्रत्येकाला स्पर्शातून हत्ती वेगवेगळा वाटला आणि त्यांनी त्याचे वर्णन केले. या बाधकथेवर आधारित आता मराठी एक चित्रपट येत आहे. याचे शीर्षक आहे 4 Blind Men.

Etv Bharat
4 Blind Men
author img

By

Published : Aug 23, 2022, 10:52 AM IST

मुंबई - मराठी चित्रपटांचा कथाविश्वाचा परीघ सातत्याने वाढत असतो आणि मेकर्स वेगवेगळ्या कथानकांसह प्रेक्षकांसाठी उत्तम चित्रपटांची निर्मिती करीत असतात. नुकतीच जिओ स्टुडिओजने नजीकच्या काळातील त्यांची चवथी पेशकश जाहीर केली आहे, ‘4 Blind Men’. त्यांनी नुकत्याच तीन वेगवेगळ्या चित्रपटांची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली आहे. 4 Blind Men हा चित्रपट ४ अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे. या चित्रपटात ४ वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते. एकामागोमाग एक अशा घडलेल्या खूनांमुळे त्यांच संपूर्ण आयुष्य कायमच बदलून जाते. प्रेक्षकांना हा थ्रिलर चित्रपट खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे.

4 Blind Men

दिग्दर्शक अभिषेक मेरूकर चित्रपटाबद्दल म्हणाले, "जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील, असे कलाकार मला भेटले. मराठी चित्रपसृष्टीत पहिल्यांदाच थ्रिलर हा चित्रपटाचा प्रकार अनुभवला जात आहे. सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला चांगलाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेची मला उत्सुकता लागलेली आहे ."

4 Blind Men
4 Blind Men

जिओ स्टुडिओजने त्यांच्या आगामी '4 Blind Men’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकत आहे.

एक हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट - चक्रधर स्वामींनी एक हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट सांगितली आहे. चार आंधळे हत्ती पाहायला गेले. एका आंधळ्याला हत्तीचा पाय हाती लागला, दुसर्‍याला त्याचे कान हाताला लागले, तिसर्‍याला त्याची शेपूट हाती लागली, चौथ्याला त्याची सोंड हाती लागली. नंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली - हत्ती कसा आहे? पाय धरणारा म्हणाला, “हत्ती खांबासारखा आहे.” शेपूट धरणारा म्हणाला, “हत्ती दोरीसारखा आहे.” कान धरणारा म्हणाला, “हत्ती सुपासारखा आहे.” आणि सोंड धरणारा म्हणाला, “हत्ती लांब हातासारखा आहे.” हे सगळे हत्तीचे अवयव आहेत, ते अवयव म्हणजे हत्ती नव्हे.

हेही वाचा - रजनीकांतच्या 169व्या जेलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.