मुंबई - हिंदी चित्रपटात अष्टपैलू आणि प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने अलीकडेच त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा साजरा केला. त्याच्या 'फूल और कांटे' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 32 वर्षे पूर्ण झालेत. या खास प्रसंगाचे औचित्य साधण्यासाठी अजयनं सोशल मीडियावर काही सुंदर व्हिज्युअल शेअर केले आहेत. यामुळे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय.
इन्स्टाग्रामवर अजय देवगणने चित्रपटातील दृश्यांची मालिका शेअर केली आणि त्याला 32 वर्षे असं कॅप्शन दिलं. त्यानं शेअर केलेले पहिले व्हिज्युअल त्याच्या आधीच्या मुलाखतीची एक छोटी क्लिप आहे, यात तो हिंदीमध्ये म्हणतो, " 'फुल और कांटे'चा प्रीमियर गॅलक्सीमध्ये होता. तिथल्याच जेमिनी या छोट्या थिएटरमध्ये आणखी एक शो सुरू होता. तिकीटांची विक्री झाली होती, म्हणून मी प्रोजेक्शन रूममधून बाहेर पडलो."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पुढे म्हणाला, "त्यामुळे पुढेच मी स्क्रिनच्या साईडला पहिल्या रांगेतील खुर्टीवर जाऊन बसलो होतो. जेव्हा ते 'कॉलेज की लडकी' गाणं सुरू झालं तेव्हा लोकांनी पैसे फेकायला सुरुवात केली. ते माझ्या डोक्यावर येऊन पडत होते. मी ते पैसे उचलून ठेवून घेतले आणि फ्रेम करुन ठेवले. तो क्षण माझ्यासाठी रोमांचित करणारा होता."
फूल और कांटे चित्रपटामुळे अजय देवगणला नावलौकिक मिळाला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि या चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना चकित करुन गेले.
दरम्यान, अजय देवगण अलिकडेच भोला या चित्रपटात अखेरचा दिसला होता. या चित्रपटात तो पुन्हा एकादा अॅक्शन करताना तडफदार दिसला. हा चित्रपट साऊथ स्टार कार्ती सुरेशच्या कैथी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. विशेष म्हणजे त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या आगामी चित्रपटात तो झळकणार आहे. यातील अजय देवगणचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय.
हेही वाचा -
2. गणेश आचार्यच्या सिग्नेचर स्टेप्सवर थिरकला किंग खान, 'डंकी'चं 'लुट पुट गया' गाणं लॉन्च
3. बॉक्स ऑफिसवर 'टायगर 3'च्या कमाईत झाली घसरण ; पाहा किती गल्ला जमवला