ETV Bharat / entertainment

Critics Choice Super Awards 2023: राम चरण, ज्यूनियर एनटीआर यांची टॉम क्रूझ, ब्रॅड पिट यांच्याशी स्पर्धा - ऑस्करपूर्वी दिग्दर्शक राजामौली

आरआरआर या चित्रपटाला आता सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपट श्रेणीतील क्रिटिक्स चॉईस सुपर अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळाले आहे. योगायोगाने, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांच्या विरोधात चुरशीमध्ये आहेत.

Critics Choice Super Awards 2023
Critics Choice Super Awards 2023
author img

By

Published : Feb 23, 2023, 6:16 PM IST

हैदराबाद - भारतीयांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे, एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला टॉप गन: मॅवेरिक आणि बुलेट ट्रेनसह सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन मूव्ही श्रेणीतील क्रिटिक्स चॉईस सुपर अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळाले आहे. राजामौली यांच्या मॅग्नम ओपसला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाल्यानंतर हे घडले आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये, राम चरण आणि नंदामुरी तारका रामाराव जूनियर अर्थात याला ज्युनियर एनटीआर म्हणूनही ओळखले जाते, ते टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांच्या विरुद्ध नामांकनामध्ये आहेत. 23 फेब्रुवारी रोजी, क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स वेबसाइटवर नामांकित व्यक्तींची घोषणा करण्यात आली, तर विजेत्यांची घोषणा 16 मार्च रोजी केली जाईल. RRR टीमने गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला होता.

दरम्यान, राम चरण नुकताच गुड मॉर्निंग अमेरिका टॉक शोमध्ये दिसला होता, जिथे त्याने RRR च्या मोठ्या यशाबद्दल चर्चा केली. राम चरण यांनी शोमध्ये सूचित केले की राजामौली यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शित करण्यात रस आहे. राम चरण, RRR मधील मुख्य नायकांपैकी एक, पुढील महिन्यात ऑस्करपूर्वी दिग्दर्शक राजामौली यांच्या चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी GMA मालिकेत तो उपस्थित होता.

RRR हा एस एस राजामौली दिग्दर्शित आणि ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण अभिनीत, या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटी रुपयांची कमाई केली. नंतर, चित्रपटाच्या 'नाटू नाटू' गाण्याने या वर्षाच्या सुरुवातीला 'सर्वोत्कृष्ट मूळ गाणे-मोशन पिक्चर'साठी गोल्डन ग्लोब जिंकला. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये पीरियड ड्रामा रिलीज झाल्यापासून, आरआरआर टीमने समीक्षकांची प्रशंसा मिळवण्याबरोबरच बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडून काढत नवे विक्म स्थापित केले आहेत.

एसएस राजामौली आणि त्याच्या टीमसाठी क्रिटीक्स चॉईस अवॉर्डमध्येमिळालेले नामांकन भारतीयांचा अभिमान वाढवणारे आहे. हा चित्रपट जगभर मनोरंजन करत असून कमाईचे नवनवे विक्रम आरआरआरच्या नावावर आहेत. आगामी काळात राजामौलींकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीची मोठी अपेक्षा भारतीय प्रेक्षक नक्कीच करु शकतात.

भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे एक वेगळे स्थान आहे. पहिल्यापासूनच वेगळ्या धाटणीचे चित्रपट या भागात झाल्याचे पाहायला मिळतात. या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अलिकडच्या काळात स्थान मिळू लागले आहे असे आता दिसून येत आहे.

हेही वाचा - Mrs Chatterjee Vs Norway Trailer Released:नॉर्वेच्या कायदेशीर व्यवस्थेविरुध्द लढणाऱ्या आईची सत्यकथा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.