ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं सुशांतच्या अंत्यसंस्काराबाबत केला धक्कादायक खुलासा - बिग बॉस 17

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' सीझन सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. या शोमध्ये रोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. दरम्यान, आता अंकितानं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित एक खुलासा केला आहे.

Bigg Boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 12:21 PM IST

Updated : Nov 21, 2023, 3:51 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 : सलमान खान होस्ट असलेला टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'चा 17वा सीझन सुरू आहे. 'बिग बॉस 17' प्रसारित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. दरम्यान, अंकिता लोखंडे तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूतची वारंवार आठवण करताना शोमध्ये दिसते. आता अंकितानं गेल्या एपिसोडमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित असा खुलासा केला आहे, जो सुशांतच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरू शकतो. अंकिता शोमध्ये तिच्या पतीसमोर देखील अनेकदा सुशांतचा विषय काढत असते. सुशांतच्या अंत्यसंस्काराला अंकिता गेली नव्हती. तसं करण्यामागचं कारण तिने आता सांगितलंय.

अंकिता लोखंडेनं केला खुलासा : काल रात्रीच्या एपिसोडची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंकिता सह-स्पर्धक मुनावर फारुकीशी स्विमिंग पूल समोर गप्पा मारताना दिसते. अंकिता सुशांत सिंग राजपूतच्या 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे यू प्यार करेगा' हे प्रेमळ गाणं गुणगुणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ती मुनावरला म्हणते की, सुशांत खूप चांगला माणूस होता. मी माझ्या आयुष्यात सुशांतसारखा माणूस कधीच पाहिला नाही. मी त्याच्यासोबत राहिली आहे आणि मला माहीत आहे की तो कसा होता. यानंतर अंकिता रडत म्हणते की, मी त्याच्या अंत्यविधीलाही जाऊ शकले नाही. सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्यामागच्या कारणाविषयी अंकिताने सांगितलं की, मी हे सर्व अचानक पाहू शकत नव्हते. त्यामुळं मी त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी जाऊ शकले नाही.

अंकिताच्या पतीनं तिला जायला सांगितलं होतं : अंकितानं पुढं खुलासा केला की, "विकीनं मला जायला सांगितलं. पण मी जाण्यास नकार दिला. मी असं कधीच कोणाला पाहिलं नव्हतं. असं मी आयुष्यात कधी अनुभवलं नव्हतं. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना अशा परिस्थितीत पाहिलं होतं. त्यावेळी, मला कळलं की कोणाचं जाणं काय असतं, माझ्या वडिलांची मला आठवण येते." यावेळी अंकिता भावूक होताना दिसते. त्यानंतर मुनावर तिचं सांत्वन करतो.

हेही वाचा :

  1. 'टीव्ही क्वीन' एकता कपूर आणि कॉमेडियन वीर दासनं एमी अवॉर्ड्स जिंकून रचला इतिहास
  2. 'टायगर 3' च्या यशाबद्दल सनी देओलनं केलं सलमान खानचं अभिनंदन
  3. सलमान खानची भाची अलिझेला `फर्रे' बाबत वाटतेय 'अन्गझाइटमेन्ट'

Last Updated : Nov 21, 2023, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.