ETV Bharat / elections

निवडणूक आचारसंहिता पथकाकडून भिवंडीत २ वेगवेगळ्या कारवाईत १२ लाख जप्त - Bhivandi Police

आचारसंहिता पथकाने आतापर्यंत एकूण ३ कारवाईत १६ लाख ६४ हजार ६०० रुपये जप्त केले आहेत.

Money
author img

By

Published : Apr 5, 2019, 8:27 PM IST

ठाणे - निवडणुकीसाठी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैशांचा वापर होण्याची भीती असल्याने आचारसंहिता पथकाकडून नाके स्थापन करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भिवंडीत आचारसंहिता पथकाने २ वेगवेगळ्या कारवाईत २४ तासात १२ लाख १४ हजार ६०० रुपये जप्त केले आहेत.

भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात कारीवली नाका या ठिकाणी आचारसंहिता पथकाकडून नियमीत वाहन तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी इनोव्हा कारमधील एका सुटकेसमध्ये दहा लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. कार ही मारु एंटरप्रायझेसचे हितेश मारु या कापड उत्पादकाची आहे. त्यांनी दैनंदिन व्यवहारासाठी रक्कम बाळगल्याचे सांगितले. परंतु, रक्कम कोठून आणली याचे ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

आचारसंहिता पथक प्रमुख अतिरिक्त गटविकासाधिकारी अविनाश मोहीते व जयवंत माने यांनी रक्कम जप्त केली. भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घटनेची माहिती कळताच कल्याण येथील आयकर विभागाच्या पथकानेही भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत चौकशी सुरू केली आहे.

रात्रीच्या कारवाईतही कारमधून २ लाख १४ हजार ६०० रुपये जप्त -
भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात साईबाबा नाका या ठिकाणी रात्रीच्या वेळी आचारसंहिता पथकाकडून शहरात येणाऱ्या वाहनांची रात्री तपासणी सुरू होती. स्विफ्ट डिझायरची तपासणी करीत असताना कारमधील डिक्कीत असलेल्या सुटकेसमध्ये २ लाख १४ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. कारमालक शांतीलाल जैन यांच्याकडे रोख रक्कमेबाबत चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ न शकले नाहीत. ही रक्कम आचारसंहिता पथकातील अधिकारी सुभाष झळके व सुनील भोईर यांनी जप्त करून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहिता पथकाने आतापर्यंत एकूण ३ कारवाईत १६ लाख ६४ हजार ६०० रुपये जप्त केले आहेत.

भिवंडीत आचारसंहिता पथकाकडुन दोन कारवाईत 12 लाख जप्त 

ठाणे :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी भिवंडी लोकसभा क्षेत्रात सुरु असुन प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तपासणी नाके स्थापन करुन वाहनांची तपासणी सुरु असुन दोन वेगवेगळ्या कारवाईत चोवीस तासात 12,14600 रुपये जप्त करण्यात आले असुन आता पर्यत एकुण तीन कारवाईत 16 लाख 64 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात कारीवली नाका या ठिकाणी आचारसंहिता पथका कडुन नियमीत वाहन तपासणी करीत असताना इन्व्होवा कारमधील एका सुटकेसमध्ये तब्बल दहा लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली असुन, सदरची कार मारु एंटरप्रायझेसचे हितेश मारु या कपडा उत्पादकांची असुन त्यानी दैनंदिन व्यवहारासाठी सदरची रक्कम बाळगल्याचे सांगीतले. परंतु त्या संदर्भात सदरची रक्कम कोठून आणली याचे समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आचारसंहिता पथक प्रमुख अतिरिक्त गटविकासाधिकारी अविनाश मोहीते व जयवंत माने यांनी सदरची रक्कम जप्त करीत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेची माहिती कळताच कल्याण येथील आयकर विभागाच्या  पथकाने सुध्दा  भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत या राक्केमेची चौकशी सुरु केली आहे . 

   तर रात्री भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात साईबाबा नाका या ठिकाणी रात्रीच्या वेळी आचारसंहिता पथक कडून शहरात येणा-या वाहनांची तपासणी सुरु असताना  MH - 04 -JM - 4081या स्विफ्ट डिझायर कर ची तपासणी करीत असताना कार मधील टिक्कीत असलेल्या सुटकेस मध्ये 2 लाख 14 हजार 600 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. कार मालक शांतीलाल जैन यांच्याकडे रोख रक्कम बाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने सदरची रक्कम आचारसंहिता पथकातील अधिकारी सुभाष झळके , सुनील भोईर यांनी जप्त करून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.