ETV Bharat / elections

शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?, गुगलीने कोणाची जाणार विकेट? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS

भाजपमध्ये गेलेले ८० टक्के नेते हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे तेही शिवसेनेऐवजी पवारांनाच जवळ करण्यासाठी आग्रही असतील. तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणे भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे. हे गणित पाहता पवारांनी सत्ता आमचीच येणार! हे केलेले वक्तव्य सुचक मानले पाहिजे.

शरद पवारांच्या "त्या" वक्तव्याचा अर्थ काय ?, गुगलीने कोणाची जाणार विकेट ?
author img

By

Published : Sep 17, 2019, 11:35 AM IST

Updated : Sep 17, 2019, 9:08 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कसलेले राजकारणी. त्यांच्या गुगलीने भल्याभल्यांच्या विकेट गेल्यात. ते कधी काय करतील याचा नेम नाही. राजकारणात कोणतीही एखादी घटना घडली, तर ती पवारांमुळेच झाली, अशी चर्चा सर्वत्रच होते. याची सवय आता महाराष्ट्राला झाली आहे. त्याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येतील, या बाबत शंका व्यक्त केली जातेय. त्यातच सोमवारी नाशिकमध्ये पवारांनी केलेले वक्तव्य महत्वाचे मानल जात आहे. "गेले त्यांची काळजी नको, सत्ता आमचीच येणार! हे वक्तव्य करून पवारांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे.

शरद पवारांच्या "त्या" वक्तव्याचा अर्थ काय?, गुगलीने कोणाची जाणार विकेट?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पवारांनी विनाअट भाजपला पाठिंबा देऊन सर्वांनाच आवाक केले होते. त्यांच्या या गुगलीने शिवसेनेची तर दांडीच गूल झाली होती. सत्तेत जाण्याची इच्छा असतानाही शिवसेनेला फक्त पवारांमुळे काही महिने विरोधातही बसावे लागले होते. पवारांच्या या खेळीमुळे शिवसेनेला सत्तेतही दुय्यम स्थान स्वीकारावे लागले होते. पवारांनी परिस्थितीनुसार भाजप बरोबरही जुळवून घेवू शकतो, असे स्पष्ट संकेतच त्यातून दिले होते.

महाराष्ट्रात सध्याही स्थिती वेगळी नाही. सत्ता येणार हा आत्मविश्वास भाजपमध्ये आहेच. २८८ जागा लढण्याची त्यांची तयारीही आहे. युती झालीच तर शिवसेनेची १०० ते ११० जागांवर बोळवण करण्याची भाजपची रणनीती आहे. या सर्व गोष्टींवर पवारांची बारीक नजर आहे. युती न करता निवडणुक लढल्यास पूर्ण बहुमत मिळेल कि नाही, या बाबत भाजप काही प्रमाणात साशंक आहे. पुढील निर्णय घेण्यासाठी ते एखाद्या संधीच्या शोधात आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

या आधीही पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. कदाचित निवडणूक निकालानंतर पवार पुन्हा एकदा भाजप सोबत जावू शकतात. शिवाय भाजपमध्ये गेलेले ८० टक्के नेते हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे स्वाभावीकपणे तेही शिवसेने ऐवजी पवारांनाच जवळ करण्यासाठी आग्रही असतील. तर शिवसेनेला सत्तेपासून दुर ठेवणे भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे. हे गणित पहाता पवारांनी सत्ता आमचीच येणार, हे केलेलं वक्तव्य सूचक मानले पाहिजे.

Intro:Body:

 गेले त्यांची काळजी नको सत्ता आमचीच येणार ! शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ काय?

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कसलेले राजकारणी. त्यांच्या गुगलीने भल्याभल्यांच्या विकेट गेल्यात. राजकारणात ते काय करतील याचा नेम नाही.....राजकारणात कोणतीही एखादी घटना घडली, तर ती पवारांमुळेच झाली अशी चर्चा सर्वत्रच होते. याची सवय आता महाराष्ट्राला झालीय.  त्याचीच प्रचेती आता पून्हा एकदा आली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी  आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येतील या बाबत शंका व्यक्त केली जातेय.  त्यातच " गेले त्यांची काळजी नको सत्ता आमचीच येणार ! हे वक्तव्य करून पवारांनी पून्हा एकदा राज्याच्या राजकारणात शंकेचे वातावरण निर्माण केले आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकु स्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीत पवारांनी विनाअट भाजपला पाठिंबा देऊन सर्वांनाच आवाक केले होते. शिवसेनेची तर दांडी गुल झाली होती. सत्तेत जाण्याची इच्छा असतानाही शिवसेनेला काही महिने विरोधात बसावे लागले. पवारांच्या खेळी मुळे शिवसेनेला सत्तेतही दुय्यम स्थान स्विकारावे लागले होते. पवारांनी परिस्थितीत नुसार भाजप बरोबरही जुळवून घेवू शकतो हा संदेश त्यातून दिला होता. 

सध्याची स्थिती वेगळी नाही. सत्ता येणार हा आत्मविश्वास भाजपमध्ये आहे. २८८ जागा लढण्याची त्यांची तयारी आहे. युती झालीच तर शिवसेनेची १०० ते ११० जागांवर बोळवण करण्याची भाजपची रणनिती आहे. या सर्व गोष्टीवर पवारांची बारीक नजर आहे. युती झाली नाही तर पुर्ण बहुमत मिळेल कि नाही या बाबत भाजप साशंक आहे. याच संधीच्या शोधात ते आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 या आधीही पवारांनी भाजपला पाठींबा दिला आहे. कदाचित निवडूक निकालानंतर पवार पून्हा एकदा भाजप जवळ जावू शकतात. शिवाय भाजपमध्ये गेलेले ८० टक्के नेते हे राष्ट्रवादीचेच आहे. त्यामुळे त्यांचा आग्रही शिवसेने ऐवजी पवारांनाच जवळ करण्याचा असेल. तर शिवसेनेला सत्तेपासून दुर ठेवणे भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे.  हे गणित पहाता पवारांनी  सत्ता आमचीच येणार ! हे केलेलं वक्तव्य सुचक मानले पाहीजे. 

Conclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.