ETV Bharat / elections

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार'तोफा' आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात आज दिग्गज नेत्यांचा सभासंह मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर राहील.

author img

By

Published : Apr 16, 2019, 8:38 AM IST

Updated : Apr 16, 2019, 9:28 AM IST

मुंबई

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात आज दिग्गज नेत्यांचा सभासंह मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर राहील, असे चित्र आहे.

दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती (अ.जा.), हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर (अ.जा.), सोलापूर (अ.जा.) या मतदारसंघात १८ तारखेला मतदान होणार आहे. सोलापूरमध्ये सुशिलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमरावतीतील नवणीत राणा यांच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघात मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या जाहिरातीतून लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या १७ एप्रिल रोजी सकाळी अकलूज येथे सभा होणार आहे. १८ तारखेला मतदान असल्याने या सभेला काँग्रेसने विरोध करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र, अकलूज हे ठिकाण सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत नसून ते माढा लोकसभा मतदारसंघातील ठिकाण आहे. आणि माढा लोकसभेचे मतदान हे २३ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे कुठल्याही नियमाचा मंग होत नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

Intro:Body:

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार'तोफा' आज थंडावणार

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात आज दिग्गज नेत्यांचा सभासंह मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर राहील.

दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती (अ.जा.), हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर (अ.जा.), सोलापूर (अ.जा.) या मतदारसंघात १८ तारखेला मतदान होणार आहे. सोलापूरमध्ये सुशिलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अमरावतीतील नवणीत राणांच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघात निवडणूक झाली होती, तर दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या जाहिरातीतून लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या १७ एप्रिल रोजी सकाळी अकलूज येथे सभा होणार आहे. १८ तारखेला मतदान असल्याने या सभेला काँग्रेसने विरोध करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र, अकलूज हे ठिकाण सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत नसून ते माढा लोकसभा मतदारसंघातील ठिकाण आहे. आणि माढा लोकसभेचे मतदान हे २३ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे कुठल्याही नियमाचा मंग होत नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 16, 2019, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.