मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभेच्या मतदानाचा हक्क सहकुटुंबासह बजावला आहे. त्यांच्यासमेवत पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी आणि मुलगा आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी हजर होते.
दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघातील मतदान केंद्रात राज ठाकरे हे मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते. त्यांच्यासमेवत संपूर्ण कुटुंब मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार दिला नाही. मात्र भाजपविरोधात सभा घेऊन राज ठाकरेंनी राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.