ETV Bharat / elections

समृद्धी महामार्गाच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी केवळ विदर्भाचा विकास केला - जयवंत जाधव - ncp

नाशिक ते दिल्लीपर्यंत युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. मात्र, नाशिककरांच्या झोळीत काहीच पडले नाही. चालू प्रकल्प बंद ठेवण्याचा व काही कार्यालय पळवून नेण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. तर गुजरातला पाणी पळवून नेण्याचा कुटील डाव युतीने केला.

माजी आमदार जयवंत जाधव
author img

By

Published : Apr 9, 2019, 1:31 PM IST

नाशिक - महापालिका, राज्य आणि केंद्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार होते. पण, नाशिकचा विकास झाला नाही. नाशिककरांची स्वप्ने या सरकारने धुळीस मिळवली. समृद्धी महामार्गाच्या नावाखाली विदर्भ समृद्धीचा घाट मुख्यमंत्र्यांनी घातला, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार जयवंत जाधव यांनी केला. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

जयवंत जाधव यांची पत्रकार परिषद

नाशिक ते दिल्लीपर्यंत युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. मात्र, नाशिककरांच्या झोळीत काहीच पडले नाही. चालू प्रकल्प बंद ठेवण्याचा व काही कार्यालय पळवून नेण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. तर गुजरातला पाणी पळवून नेण्याचा कुटील डाव युतीने केला. आज पाण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. त्याबरोबरच एमआयडीसीमधून नाशिकला वगळले. विदर्भाला समृद्ध करण्याकरता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कवडीमोल दराने जमिनी घेतल्या, असा आरोप जाधव यांनी केला.

आघाडीचे दोन्ही उमेदवार दिंडोरीचे धनराज महाले आणि नाशिकचे समीर भुजबळ कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता जयंत पाटील ,बाळासाहेब थोरात ,नवाब मलिक ,सुधीर तांबे काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते उपस्थित राहतील अशी माहिती जाधव यांनी दिली.

Intro:नाशिक महापालिकेत राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार असल्याने नाशिककरांना विकासाची अपेक्षा होती मात्र तसे न होता नाशिककरांची स्वप्न धुळीला मिळण्याचे काम युतीने केले समृद्धी महामार्गाच्या नावाखाली विदर्भ समृद्धीचा घाट मुख्यमंत्री घालत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार जयवंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली

Body:नाशिक ते दिल्लीपर्यंत भाजपा युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नाशिक हे दत्तक घेतले होते मात्र ह्या नाशिककरांच्या झोळीत काहीच पडलं नाही असलेले चालू प्रकल्प बंद ठेवण्यात व काही कार्यालय पळवून नेण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने केला तर काही प्रकल्प पळवून नेले गुजरातला देखील पाणी पळवून नेण्याचा कुटील डाव भाजपा युती केला आज पाण्याचा विषय ऐरणीवर आला आहे त्याबरोबरच एम आय डि सी मधून नाशिकला वगळले विदर्भाला समृद्ध करण्याकरता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कवडीमोल दराने जमिनी घेतला त्याच बरोबर फॉरेस्ट कार्यालय एन एच आर डी एफ कार्यालय हे विदर्भाला पळवण्यात आले

Conclusion:याबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता आमचे उमेदवार असतील आणि सर्व आमचे कॉंग्रेस आणि मित्र पक्ष सगळ्या या नेत्यांच्या बैठकीमध्ये असा सूर निघाला या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील रहदारीचा विषय लक्षात घेता उद्याचा अर्ज आणि समाजातील उपेक्षित घटक आणि त्याच्या समवेत आमच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील सगळे पक्ष नेते यांच्या उपस्थितीत आमचे दोन्ही दिंडोरीचे धनराज महाले यांनी नाशिकचे समीर भुजबळ हे दोन्ही उमेदवार उद्या अशा साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी अर्ज सादर करण्या करता प्रामुख्याने राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील ,बाळासाहेब थोरात ,नवाब मलिक ,सुधीर तांबे काँग्रेसचे सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शेतकरी कामगार नेते उद्या अर्ज भरण्यासाठी प्रमुख्याने हे सर्व नेते उपस्थित राहणार आहे नाशिक मध्ये
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.