ETV Bharat / elections

LokSabha Election:सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास ६० टक्के मतदान - sushilkumar shinde

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास ६० टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सोलापूर
author img

By

Published : Apr 18, 2019, 7:30 AM IST

Updated : Apr 18, 2019, 9:47 PM IST

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास ६० टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले असून एकूण ९२ ठिकाणी ६ वाजल्यानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी मिळण्यासाठी वेळ लागणार आहे.

सोलापूर

लोकसभा क्षेत्रांमध्ये बंद पडलेल्या २९ ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या असल्याचीही माहिती राजेंद्र भोसले यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी तांत्रिक दोषामुळे मतदान युनिट वेळेत सुरू झाले नाहीत. ज्या ठिकाणच्या तक्रारी आल्या येथील युनिट बदलण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Live update -

  • 5.50- सांयकाळी पाच वाजेपर्यंत ५२.०२ टक्के मतदान
  • अक्कलकोट तालुक्यातील आळगी, अंकलगी, गुड्डेवाडी, कुडल या ४ गावातील नागरिकांचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार
  • उळे गावात मतदान यंत्रात बिघाड, सव्वा तासानंतर मतदान सुरू
  • 2.00 - दुपारी एकवाजेपर्यंत ३१ टक्के मतदान
  • 12.00 - सकाळी ११ वाजेपर्यंत १६.४८ टक्के मतदान
  • 10.25 - आमदार भारत भालके यांनी पंढरपुरात केले मतदान
  • 10.15- भाजपचे उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महाराजांनी अक्कलकोट तालुक्यातील गौडगावमध्ये केले मतदान
  • 9.40- पहिल्या दोन तासात 6.87 टक्के मतदान
  • 9.10- दमाणी नगर येथील एका शाळेतील बुथवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानास १ तास उशीराने सुरुवात
  • 8.43 - पंढरपूर शहरातही मशीन बंद पडल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले (पंढरपूर गौतम विद्यालय)
  • 8.42 - सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील शाळेतील मतदान यंत्र बंद पडल्याने एक तासाने उशिरा मतदान सुरू
  • 8.41 - उत्तर सोलापूर तालुका मतदारसंघातील तळे हिप्परगा येथील हर्षवर्धन शाळेतील मतदानकेंद्रावर मशीन खराब झाल्याने 1 तास उशिरा मतदान सुरू
  • 8.40 - जुना वालचंद कॉलेज बूथ नं 91 येथे EVM मशीन बंद अजून मतदान चालू नाही
  • 8.40 - भंडारकवठे गावात तसेच सोलापूर शहरात चाँद तारा मशीद परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याची तक्रार
  • 8.38 - शहरातील विविध भागात ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी
  • 8.36 - पीडब्ल्यूडी येथील ईव्हीएम मशीन बंद पडून एक ते दीड तास झाले बंद पडली आहे, नीलम नगर जिल्हा परिषद शाळा ( प्रभाग 19) येथे देखील एक मशीन बंद पडले.
  • प्रभाग क्रमांक ७ मधील सोलापूर महानगरपालिका उर्दू मुलींची शाळा क्रमांक 2 येथील दोन मशीन बंद आहेत.
  • 8.35 - सोलापुरातील चंपावती विद्यालयामध्ये जिल्हाधिकारी अस्तीक पांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • 8.25 - एका गरोदर महिलेने आपल्या पतीसह बजावला मतदानाचा हक्क.. नेहरूनगरातील बुथ क्रमांक १६४ मध्ये केले मतदान
  • 7.20 - मतदान केंद्राबाहेर माध्यम प्रतिनिधींचा गोंधळ, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रीया घेताना घडला प्रकार
  • 7.08 - काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेनी कुटुंबासहित बजावला मतदानाचा हक्क, पत्नी उज्ज्वला शिंदे, मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित

Intro:Body:

Loksabha Election: सोलापुरात मतदानाला सुरुवात

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. राज्यातील १० मतदारसंघांपैकी सोलापूर मतदारसंघातही मतदान सुरू झाले आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 18, 2019, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.