ETV Bharat / elections

Lok sabha Election : लोकसभा मतदानाचा राज्यातील तिसरा टप्पा पूर्ण, दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

आज लोकसभेच्या १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि जालना या मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील दिग्गज उमेदवार
author img

By

Published : Apr 23, 2019, 7:21 AM IST

Updated : Apr 23, 2019, 8:32 PM IST

मुंबई - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. लोकसभेच्या १४ जागांसाठी आज मतदान झाले. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. राज्यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.०१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान ६५.७० टक्के कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. आज सर्व दिग्गजांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. मात्र, कुणाचा विजय होणार? हे २३ मे'लाच ठरणार आहे.

लोकसभेसाठी राज्यात ४ टप्प्यात मतदान होणार होते. यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झाले. ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ७ जागांसाठी मतदान झाले होते, तर १९ एप्रिलला राज्यातील १० जागांसाठी मतदान झाले होते. तर आज (२३ एप्रिल) १४ जागांसाठी मतदान प्रकिया पूर्ण झाली.

'या' दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद
सुप्रिया सुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, साताऱ्याचे उदयनराजे भोसले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील, सांगलीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील, राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे, नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे, एकनाथ खडसे यांच्या सुन रक्षा खडसे यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.

येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत लोकांना निकालाची उत्सुकता असणार आहे.

राज्यात आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी -

  • ७.१८ वा. - कोल्हापूर आणि जळगाव मतदारसंघात मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल
  • ७.०३ वा. - हातकणंगले मतदार संघात मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल
  • ७.०० वा. - अहमदनगरमधील बाबुर्डी बेंद येथे ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न. जालिंदर चोभे अनेक वर्षांपासून ईव्हीएमविरुद्ध लढा देत आहेत. आज त्यांनी ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • राज्यात सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी
  1. औरंगाबाद - ५८.५२ टक्के
  2. जळगाव - ५२.२८ टक्के
  3. रावेर - ५६.९८ टक्के
  4. जालना - ५९.९२ टक्के
  5. रायगड - ५६.९२ टक्के
  6. पुणे - ४३.६३ टक्के
  7. बारामती - ५५.८४ टक्के
  8. अहमदनगर - ५७.८४ टक्के
  9. माढा - ५६.४१ टक्के
  10. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ५७.६३ टक्के
  11. कोल्हापूर - ६५.७० टक्के
  12. हातकणंगले - ६४.६९ टक्के
  • ५.५० - महाबळेश्वर येथील रांजनवाडी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद. मतदानासाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे.

  • ४.३६ - पुण्यात वधुने लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क.

  • दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात झालेले मतदान

  1. औरंगाबाद - ४२.६२ टक्के
  2. जळगाव - ४२.६२ टक्के
  3. रावेर - ४६.४ टक्के
  4. जालना - ४९.४० टक्के
  5. रायगड - ४७.९७ टक्के
  6. पुणे - ३६.२९ टक्के
  7. बारामती - ४५.३५ टक्के
  8. अहमदनगर - ४५.६५ टक्के
  9. माढा - ४४.१३ टक्के
  10. सांगली - ४६.६४ टक्के
  11. सातारा - ४४.७७ टक्के
  12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ४७.१८ टक्के
  13. कोल्हापूर - ५४.२४ टक्के
  14. हातकणंगले - ५२.२७ टक्के
  • दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात ३५.७० टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक ४२.०४ टक्के मतदानाची नोंद
  • १.१० - सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार भास्कर जाधव यांनी कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क. चिपळूण तालुक्यातील तुरुंबव येथे केले मतदान. मतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन.
  • १२.३० - कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले मतदान
  • ११.४५ - कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ११ वाजेपर्यंत राज्यात २१.३८ टक्के मतदान; कोल्हापूरमध्ये सर्वाधिक २५.४९ टक्के मतदानाची नोंद
  • १०.५० - अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीमध्ये बजावला मतदानाचा हक्क
  • १०.४८ - माढा : ज्येष्ठ आमदार गणपत आबा देशमुख यांनी मतदान केले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
  • १०.४७ - औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सहकुंटुंब बजावला मतदानाचा हक्क.
  • १०.४५ - औरंगाबाद : काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सिडको ऐन 3 येथील संत मीरा हायस्कुल येथे त्यांनी मतदान केले.
  • १०.३० - रत्नागिरी : मिरजोळे येथील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. हनुमान नगर आणि लक्ष्मीकांत वाडीतल्या मतदार केंद्रात झाला होता बिघाड. सुमारे २० मिनिट मतदान प्रकिया थांबली होती. मशिन बदलून मतदान प्रक्रियेला सुरुवात.
  • १०.२२ रत्नागिरी - मतदानासाठी घराबाहेर पडा, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंचे आवाहन
  • १०. २१ - माढा : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विकासावर न बोलता केवळ मोहिते -पाटलांवर टीका करण्यात आली - रणजितसिंह मोहिते-पाटील
  • १०.२० - सांगली : काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क. कडेगावच्या सोनसळ येथे केले मतदान.
  • १०.१५ - पुणे मतदारसंघाचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये सहकुटुंब केले मतदान. पुण्यातील चारही मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा व्यक्त केला विश्वास..
  • ९.५५ - माढ्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८५ टक्के मतदान, रणजितसिंह मोहितेंनी बजावला मतदानाचा हक्क
  • ९.५० सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ८.२१ टक्के मतदान; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक १०.९७ टक्के
  • ९.३५ - जळगाव - खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क; मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
  • ९.३० - कोल्हापूर - काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ९.३० - हातकणंगले : वाळव्याच्या साखराळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • ९.१८ - हातकणंगले - सकाळी ९ वाजता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.
  • ९.१५ - पुणे - भाजपकडून रात्रीपासूनच मुक्तपणे गुंडांचा आणि पैशाचा वापर सुरू असल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला
  • ९.०२ - सांगली : भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. तासगावच्या चिंचणी या आपल्या मूळ गावी केले मतदान .
  • ८ः५० - सातारा : युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले मतदान.
  • ८.४९ - औरंगाबाद शहरातील कडा कार्यालयाच्या यांत्रिकी विभाग येथील मतदान केंद्रावर ४० मिनिटे उशिरा मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान यंत्र सुरू न झाल्यामुळे काही काळ मतदारांना ताटकळत राहावे लागले. ७ वाजता सुरू होणारी मतदान प्रक्रिया ७.४० वाजता सुरू झाली.
  • ८.४८ - जालना मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. पत्नी वैशाली आणि मुलगी सारिका औताडे यांच्यासह आपल्या मूळगावी पळशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन केले मतदान.
  • ८.४५ - सांगलीत तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद
  • ८.०७ - बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी केले मतदान
    • Maharashtra: Nationalist Congress Party's Supriya Sule along with her family casts her vote a polling station in Baramati; She is sitting MP and NCP MP candidate from Baramati pic.twitter.com/iNVAP3QDAr

      — ANI (@ANI) April 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • ८.०६ - सातारा - उदयनराजे भोसलेंनी बजावला मतदानाचा हक्क
  • ८.०५ - पुण्यातल्या कोथरूडमधील भारतीय शिक्षण संस्था केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान पाऊण तास उशीराने सुरू
  • ८.०४ - बारामती मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल आणि आमदार राहुल कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ८.०३ - काँग्रेस-राष्ट्रवादीने मतभेद विसरून एकोप्याने निवडणूक लढवली त्यामुळे यश निश्चित, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
  • ८.०२ - माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे मूळ गाव निमगांव येथील २६९ क्र. जिल्हा परिषद मतदान केंद्रावरील ईव्हीम मशिन सकाळपासून बंद. नवीन मशीन मागवण्यासाठी लागला वेळ. मतदान केंद्रावर एक तासाने मतदान सुरू.
  • ८.०० - औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गारज येथे सकाळी ७ वाजेपासून मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरू झाले.
  • ७.५० - कोल्हापूर : आघाडीचे उमेदवार धंनजय महाडिक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • ७.३३ - जळगाव - जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे व काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
  • ७.३१ - सांगली - सकाळी ७ वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे तिरंगी लढत होत असून भाजप विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी अशी निवडणूक पार पडत आहे.
  • ७.३० - हातकणंगले - सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे राजू शेट्टी आणि युतीचे धैर्यशील माने यांच्यात होणार आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.
  • ७.२९ - तिसऱ्या टप्प्यात सातारा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथून आघाडीकडून उदयनराजे भोसले निवडणूक लढत आहेत. तर, युतीकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील रिंगणात आहेत.
  • ७.२७ -औरंगाबाद - सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. येथून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकात खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड तर वंचित आघाडीकडून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून हर्षवर्धन जाधव यांच्यात मुख्य लढत आहे. त्यामुळे येथून कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
  • ७.२६ - जालना - सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विलास औताडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या लढतीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
  • ७.२६ - बारामती मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल आणि आमदार राहुल कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • ७.२४ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काटेवाडी येथे केले मतदान
  • ७.०० - बारामती मतदासंघात मतदानाला सुरूवात

Intro:Body:

Loksabha Election तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या टप्प्यात १४ मतदारसंघाचा समावेश आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 23, 2019, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.