ETV Bharat / elections

भुजबळ म्हणजे नाशिकचे आसाराम बापू - खा संजय राऊत

नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.

खासदार संजय राऊत
author img

By

Published : Apr 6, 2019, 10:46 AM IST

नाशिक - साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करुन आलेल्या आसाराम बापू उर्फ भुजबळ कुटुंबीयांनी नाशिककरांची जबाबदारी घेतली का, असे म्हणून खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर टीका केली. समीर भुजबळ निवडणुकीला उभे राहतातच कसे, असा प्रश्न त्यांनी केला. नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.

सभेत भाषण करताना संजय राऊत

पाकिस्तान धार्जिणे षड्यंत्र २०१९ च्या निवडणुकीत केले जात आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. तसेच, मायावती आणि शरद पवार यांच्या राजकीय महत्वकांक्षेवर त्यांनी टीका केली. मायावती, शरद पवार, मुलायम सिंह या सर्वांनाच पंतप्रधान व्हावे वाटते. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गिरीश महाजन यांनी समीर भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाचा काय पाढा वाचावा हे तर सर्व नाशिककरांना माहीतच आहे. कितीही पैसे वाटले जाहिरातबाजी केली कुटनिती केली तरी जनता मत देणार नाही. मात्र समीर यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. एवढे सर्व झाले तरी निवडणुकीला उभे राहिले. हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचे आव्हान यावेळी गिरीश महाजनांनी केले.

Intro:नाशिक मधील महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ कुटुंबांवर हल्लाबोल केला साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करून आलेले श्रद्धेय पूजनीय अशा आसारामजी बापू उर्फ भुजबळ कुटुंबीयांनीच नाशिककरांची जबाबदारी घेतली का असा सवाल संजय राऊत यांनी केला तर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाचा काय पाढा वाचावा तो सर्व नाशिककरांना माहित आहे एवढे होऊनही समीर उभे राहतात हेच विशेष आहे अशी टीका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये केली

Body:तर संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका करत त्यांना आसारामबापूंची उपमा दिली साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार घेऊन आलेल्या श्रद्धेय आसाराम बापू आणि परिवार त्यांच्यासमोर उभे आहेत त्यांचा बंदोबस्त गिरीश महाजन यांनी करावा लागेल असा टोला लगावला तर पाकिस्तान धार्जिणे षड्यंत्र 2019 च्या निवडणुकीत केले जाताय तर मायावतीची ही त्यांनी खरपूस समाचार घेतला मायावती म्हणतात मी देशासाठी त्याग केला असे ते सांगत फिरतात मेने शादी नही की असं त्या सांगतात पण त्यांनी लग्न केलं असतं तर देश एका संकटातून वाचला असता असे संजय राऊत म्हणाले तर या देशात अनेक पंतप्रधानांच्या रांगेत आहेत तिकडे शरद पवार कायम पंतप्रधानांच्या रांगेत आहेत तर मुलायमसिंह मायावती सर्वांनाच पंतप्रधान व्हावं असं वाटतं असून मात्र या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता तर महाराष्ट्र हम दो हमारे दो नही हम दो हमारे 40 से उप्पर येतील आणि हीच ताकत आता आपल्या राज्याची दाखवून द्यायची आहे

Conclusion:गिरीश महाजन यांनी समीर भुजबळ यांच्यावर चांगलीच टीका केली ते म्हणाले समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाचा काय पाढा वाचावा हे तर सर्व नाशिककरांना माहीतच आहे कितीही पैसे वाटला जाहिरातबाजी केली कुटनिती केली तरी जनता मत देणार नाही मात्र समीर यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे एवढं सर्व झाले तरी निवडणुकीला उभे राहिले
हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचे आव्हान यावेळी गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांना केले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.