नाशिक - नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे पूजा विधी करण्यासाठी आलेले यजमान पळवल्याच्या कारणावरून पौरोहित्य करणाऱ्या पुजारी भावांसह दोन टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना हिरावाडीत (Hirawadi) परिसरात घडली (Violent Clashes Between Priests In Trimbakeshwar). यावेळी पुजाऱ्यांच्या वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता, कारमधून एक गावठी कट्टा, 11 जिवंत काडतुसे, चाकू आदी साहित्य जप्त (Gun's and Cartridges confiscated At Trimbakeshwar) करण्यात आले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसात (Panchawati Police Station) गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथून एक यजमान त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी (Worship Rituals) करण्यासाठी आले होते. मात्र, आपले यजमान पळवल्याची कुरापत काढत दोन पुजारी भावांमध्ये वाद होत जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी पुजाऱ्यांच्या वाहनांची तपासणी केली असता, त्यांना त्यात एक गावठी कट्टा, 11 जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे मिळून आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आशिष त्रिवेदी, मनिष त्रिवेदी, वीरेंद्र त्रिवेदी, सुनील तिवारी, आकाश त्रिपाठी, अनिकेत तिवारी, सचिन पांडे यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व जण एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्व त्र्यंबकेश्वर येथे पौरोहित्य करण्याचा व्यवसाय करतात.
सात जण अटकेत
दोन्ही कुटुंब पंचवटीतील हिरावाडीमध्ये वास्तव्यास असल्याने नाशकात परत शाब्दिक वाद झाले. परत आल्यानंतर तुंबळ हाणामारी झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी आम्ही सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, 11 जिवंत काडतुसे, चाकू, हॉकी स्टिक मिळून आली असल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितलं आहे.
परराज्यातील पुरोहितांचा शिरकाव
बारा ज्योतिर्लिंगांमधील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या त्रंबकेश्वरला धार्मिक व ऐतिहासिक वारसा आहे. येथे हजारो वर्षापासून परंपरागत धार्मिक पूजा, पाठ होतात. येथील सर्व मराठी कुटुंब कायम रहिवासी असून, भाविकांची पिढ्यानपिढ्या पुरोहितांवर श्रद्धा विश्वास आहे. परंतु, दहा-बारा वर्षांपासून परराज्यातील तरुण आणि पांथस्थ पूजारी त्र्यंबकेश्वर नगरीत शहराबाहेर आले आहेत. त्यांनी मंदिर परिसरातील व्यावसायिकांशी संगणमत करून हे प्रकार सुरू केले आहेत. त्यातून या घटना घडत असल्याचे त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी म्हटलं आहे.
गुन्हेगाराला कुठला वर्ण नसतो
गुन्हेगाराला कुठला वर्ण नसतो. ज्यांनी हाणामाऱ्या केल्या त्यांच्याकडे गावठी कट्टा, काडतुसे सापडले. ते नाशिक, त्र्यंबकेश्वरचे पुरोहित नव्हते. ते बाहेरून आलेले पांथस्थ होते. त्यामुळे भाविकांनी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या विद्वान ब्राम्हणांना प्राधान्य द्यावे. शासनाने देखील यात लक्ष घालून स्थानिक ब्राह्मण आणि बाहेरून आलेले ब्राम्हण यांची माहिती घ्यावी व स्थाबिक पुरोहितांना प्राधान्य द्यावे असं मतं महंत अनिकेत देशपांडे यांनी व्यक्त केलं.
Priest Clashes In Nashik : यजमान पळवले, नाशकात पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी, गावठी कट्टा, काडतुसे जप्त - पंचवटी पोलिस
एकमेकांचे यजमान पळविल्याच्या कारणावरून नाशिकातील त्रंबकेश्वर शहरात दोन पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी (Violent Clashes Between Priests In Nashik) झाली. ही घटना पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी झडती घेतली असता, पुजाऱ्यांच्या गाड्यांमधून गावठी कट्टा व काडतुसे जप्त (Gun's and Cartridges confiscated) करण्यात आली आहेत.
![Priest Clashes In Nashik : यजमान पळवले, नाशकात पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी, गावठी कट्टा, काडतुसे जप्त धारदार शस्त्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13847924-606-13847924-1638944752622.jpg?imwidth=3840)