पुणे - मद्यप्राशन ( Alcoholism ) करून त्रास देत असल्याच्या कारणातून मुलानेच मावसभावाच्या साथीने आपल्या पित्याचा दोरीने गळा आवळून खून ( Son Killed Father ) केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मृतदेह दुचाकीवरून मध्यरात्री बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंट परिसरात टाकून दिला होता. पुण्यातील कोंढवा पोलिसांनी खुनाचा छडा लावून रेल्वेने राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मुलाला व त्याच्या मावस भावाला रेल्वे स्टेशनवर अटक केली आहे.
पित्याकडून दारू पिऊन मारहाण - सोनू पवन शर्मा (वय.25,रा.मानाजीनगर, नर्हेगाव, मूळ मध्यप्रदेश), शैलेंद्र गोवर्धन अहिरवार (वय.22,रा. नर्हेगाव मुळ मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पवन देबू शर्मा (वय.40,रा. मानाजीनगर नर्हे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवन शर्मा हा मुलगा सोनू आणि त्याची आई यशोदा या दोघांना दारु पिऊन आल्यानंतर सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. सतत होणार्या त्रासाला सोनू कंटाळला होता. त्यातूनच त्याने वडील पवन याचा खून करण्याची योजना आखली. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कोठे टाकायचा यासाठी विविध ठिकाणची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी बोपदेव घाटाची निवड केली. मध्यरात्रीच्यावेळी पवन याचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर दुचाकीवरूनच त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून दिला.
घटनेच्या दिवशीही मारहाण - मृत पवन हा दारु पिऊन आल्यानंतर बायको व मुलाला नेहमीच मारहाण करत असे. 13 जून रोजी दारु पिऊन आल्यानंतर पवन याने दोघांना मारहाण केली होती. मात्र त्या रात्रीपासून पवन, मुलगा व बहिणीचा मुलगा तिघे घरी आले नसल्याचे बायकोने पोलिसांना सांगितले. पोलिसांना संशय आला त्या दोघांचा शोध सुरू घेण्यास सुरूवात केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला त्यावेळी दोघे रेल्वे स्टेशन येथून मूळ गावी मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. खून झालेल्या व्यक्तीचा कोणताही पुरावा नसताना अतिशय कौशल्यपूर्वक तपास करून खुनाचा छडा पोलिसांनी लावला.
हेही वाचा -Rahul Gandhi: ईडी'कडून राहुल गांधींचा चौकशीच्या मुदतीचा अर्ज मंजूर; आता 20 जुनला होणार चौकशी