ETV Bharat / crime

Thane crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील सावत्र बापाची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याच्या खोटया गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये ( prison ) असलेल्या आरोपी या तरुणाची कल्याणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. हरणे ह्यांनी गुन्ह्याशी त्यांचा कोणताही सबंधच नसल्याचे निर्कष नोंदवित रामनगर पोलीस स्टेशनच्या ( Ramnagar Police Station ) तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत, निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती आरोपिची बाजु न्यायालयापुढे मांडणारे (Mumbai Crime ) वकील गणेश घोलप यांनी यावेळी दिली आहे.

author img

By

Published : Jul 2, 2022, 11:15 AM IST

Thane crime
ठाणे गुन्हा

ठाणे - अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याच्या खोटया गुन्ह्यामध्ये कारागृहामध्ये ( prison ) असलेल्या आरोपी तरुणाची कल्याणचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.डी. हरणे ह्यांनी गुन्ह्याशी त्यांचा कोणताही सबंधच नसल्याचे निर्कष नोंदवित रामनगर पोलीस स्टेशनच्या ( Ramnagar Police Station ) तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत, निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती आरोपिची बाजु न्यायालयापुढे मांडणारे (Mumbai Crime ) वकील गणेश घोलप यांनी यावेळी दिली आहे.

मुंबईत स्वत:ची प्रिंटींग प्रेस चालविणाऱ्या २८ वर्षीय आरोपी काळाचौकी येथे खानावळ चालविणाऱ्या ३४ वर्षीय घटस्फ़ोटीत महिलेशी तिच्या भावाच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. महिलेचा २०११ मध्ये घटस्फ़ोट होऊन, तिला १५ वर्षीय मुलगी व १८ वर्षीय मुलगा होता. अविवाहित आरोपी तिचा मुला- बाळांना देखील स्विकार केला होता. स्वत:च्या कमाईने ४ लाखांमध्ये पागडी पध्दतीने डोंबिवलीतील आयरे गावामध्ये घर खरेदी करुन, मुलांचे शिक्षण प्रवेश डोंबिवलीतील नामांकीत शाळेत करुन दिला होता. ६ मे २०१५ रोजी १५ वर्षीय मुलीने आपले सावत्र वडील आरोपी याच्या विरोधात ते १ वर्षापासुन २६ एप्रिल २०१५ पर्यंत सातत्याने रहात्या घरात बलात्कार करत असल्याबाबतची फ़िर्याद नोंदविल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. ( Mumbai Crime )

सरकार पक्षातर्फ़े पिडीता, तिचा भाऊ, प्रियकर, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले होते. पिडीता आपल्या आणखीन दुसऱ्या प्रियकराला व आईसोबत घटस्फ़ोट घेतलेल्या पुर्वीच्या वडीलांसोबत कोर्टात साक्ष देण्यासाठी आली होती. शिवाय ती व तिचे आई, वडील एकत्र रहात असल्याचे सांगताना सावधान इंडीया सिरियल बघुन आई, वडील व मी आरोपी गोवल्याचे उलट तपासात सांगताना बलात्कार झाल्याच्या अनुंषगाने नव्हे, तर फ़िनेल पिण्यामुळे प्राथमिक उपचार करण्यासाठी बाह्यरुग्ण म्हणुन तिच्यावर उपचार करण्यात आला होता. ( Mumbai Crime ) तिच्यावर बलात्कार झाल्याबाबत कोणताही अहवालच नव्हता, शिवाय आम्ही ते घरदेखील विकले असल्याची कबुली त्यांनी दिली होती. आपल्या प्रियकरासोबत फिरते म्हणुन, मोबाईलवर अश्लिल क्लिप दाखवत जीवे मारण्याची धमकी देत राहत्या घरात बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला नियुक्तीला असतानाही प्रोबेशन पिरीयडवर असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन मदगुण यांनी गुन्ह्याचा तपास तसेच पुरुष डाक्टरांनी तिची तपासणी केली होती.

या गुन्ह्याचा तपास हा सुरवातीला फ़िर्याद देण्यापासुन ते चार्जशिट, तसेच उलट तपासातील माहिती यामध्ये प्रचंड विरोधाभास दिसुन आला होता. तपास यंत्रणेबाबत प्रचंड संशय निर्माण होईल, अशा बाबी अॅड. गणेश घोलप, स्वप्नील चौधरी व मोनिका गायकवाड यांनी समोर आणल्यावर न्यायालयाने तपास यंत्रणेबाबत विशेष नोंदी घेऊन न्यायालयाने सोमवारी आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती अॅड. गणेश घोलप यांनी दिली आहे.

हेही वाचा - Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.