सांगली : मटण आणि मच्छी मार्केटच्या वादातून मिरजे मासे आणि मटण विक्रेत्यांच्या गटात जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. यावेळी मिरज पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. पण, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ( Incident Created Tension in Area )
मिरज मच्छी व मटण मार्केटची दुरुस्ती 100 वर्षांनंतर : मिरज मटण मार्केट व मच्छीमार्केट गेले 100 वर्षे दुरुस्ती काम झाले नव्हते. मटण दुकानदार व मच्छी दुकानदार यांच्यात वाद असल्याने दोघांनी न्यायालयात धाव घेतली होती. तर अद्ययावत मच्छीमार्केट व मटण मार्केट करण्यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 67 लाख रुपये निधी मंजूर करीत, या कामाचे आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी ठेकेदाराने मच्छीमार्केट बाहेरील भिंत पडण्यासाठी सुरुवात करताच मटण व्यापाऱ्यांनी विटा घेऊन कामगारांच्या अंगावर धाऊन जाऊन विरोध केला. तिथे असणाऱ्या मासे विक्रेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली.
मार्केटच्या बांधकामावरून दोन गट एकमेकांना भिडले : ज्यातून जोरदार वाद होऊन मासे व मटण दुकानदार यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी दिसेल ते हत्यार घेऊन दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना मारहाण करू लागले. मात्र, वेळेत यावेळी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही गटाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला, पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : Shiv Sena support to BJP : खासदारांचे बंड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे देणार भाजपला पाठिंबा ?
हेही वाचा : Mulund Crime : सुन्न करणारी घटना! आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न