ETV Bharat / crime

Amravati Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरण यशोमती ठाकूरांनी दाबण्याचा प्रयत्न केला; रवी राणांचा गंभीर आरोप

author img

By

Published : Jul 2, 2022, 5:08 PM IST

हिंदू समाजाच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे उमेश कोल्हे यांचा खून झाला. याबाबतची लेखी तक्रार खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर अमरावती एनआयएची टीम चौकशीसाठी आली.

Ravi Rana allegations
रवी राणांचा गंभीर आरोप

अमरावती - अमरावतीत उमेश कोल्हे नामक औषध विक्रेते यांचा खून हा हिंदू समाजाच्या समर्थनात केलेल्या पोस्टमुळे झाला असल्याचा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. 21 जूनला झालेल्या हत्या दाबण्याचा प्रयत्न तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त यांनी केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रवी राणांचा गंभीर आरोप

आपल्या दुकानातच असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. उदयपूर सारखी घटना अमरावती घडली असून, तिला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हे सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अमरावतीचे पोलिस आयुक्त आर पी सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात येणार आहे आणि सीबीआयच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.