ETV Bharat / crime

School Bus Overturned : पन्हाळा तालुक्यातील शाळेची बस पलटी; जीवितहानी नाही, किरकोळ दुखापत - No one was seriously injured

कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात ( Kotoli in Panhala Taluka of Kolhapur ) लहान मुलांच्या खासगी शाळेची बस शेतात पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मुलांना प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थी के. एस. चौगले इंग्लिश मीडियम शाळेतील ( Chougale English Medium School ) विद्यार्थी आहेत. रस्ता अरूंद, तसेच पावसाळ्यात रस्ते निसरडे होत असल्याने बस शेतात पलटी झाल्याची वर्तवण्यात येत आहे. ( 20 to 25 Children Traveling in Bus )

School bus crash
शाळेच्या बसचा अपघात
author img

By

Published : Jul 11, 2022, 3:19 PM IST

Updated : Jul 11, 2022, 7:45 PM IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात कोतोली ( Kotoli in Panhala Taluka of Kolhapur ) येथे लहान मुलांच्या खासगी शाळेची बस शेतात पलटी झाली. यामध्ये 20 ते 25 मुले प्रवास करीत ( 20 to 25 Children Traveling in Bus ) होती, अशी माहिती मिळत असून, अनेकजण जखमी झाले आहेत. कोतोली परिसरातील काही गावांमधून मुलांना घेऊन ही बस शाळेकडे जात होती. मात्र, पिंपळे गावातून आळवे गावाकडे जाताना असलेल्या अरुंद रस्त्यावरू खाली शेतामध्ये ही बस पलटी झाली. येथील के. एस. चौगले इंग्लिश मीडियम शाळेमधील ( Chougale English Medium School ) हे सर्व विद्यार्थी होते.

शाळेमध्ये पालकांची गर्दी : दरम्यान, बस पलटी होऊन अपघात झाल्याची माहिती समजताच उत्रे, वाघवे, पिंपळे गावातील जे काही विद्यार्थी यामधून आले होते. त्यांच्या पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन याबाबत माहिती घेतली. एकूण 20 ते 25 विद्यार्थी यामधून शाळेकडे चालले होते. मात्र, पिंपळे गावातून आळवे गावात जात असताना अरुंद रस्त्यावरून बस जात असताना शेजारीच असलेल्या शेतात कोसळली आणि पलटी झाली. या सर्वांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार केले. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून, काहीजण किरकोळ जखमी आहेत.

पावसाळी वातावरणामुळे रस्ते निसरडे : जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांत आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्या रस्त्यांवर पाणी साचले असून, रस्तेदेखील निसरडे झाले असल्याने रस्त्यावरून वाहनेदेखील घरसरून पडत आहेत. वातावरणदेखील ढगाळ स्वरूपाचे आहे. जिल्ह्यासह परिसरातील विविध भागांत आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा : Mangesh Desai Car Accident : धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात

हेही वाचा : Doctor commits suicide in Kolhapur : कोल्हापुरात डॉक्टर तरुणीची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; फुटपाथवर आढळला मृतदेह

हेही वाचा : Raju Shetti : '...नाहीतर तुमचा कार्यक्रम ओक्के हाय'; राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

Last Updated : Jul 11, 2022, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.