सातारा - पाटण तालुक्यातील ( Patan Taluka ) महाविद्यालयीन तरूणीच्या हत्येचा साडेतीन वर्षांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरूणीच्या आजीसह आणखी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाविद्यालयातून घरी येताना झाला होता खून - करपेवाडी ( Karpewadi crime ) गावातील भाग्यश्री माने ही 22 जानेवारी 2019 रोजी सकाळी कॉलेजला गेली होती. मात्र, दुपारी करपेवाडी गावालगतच्या शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा ढेबेवाडी पोलिसांनी सर्व बाजुंनी तपास केला होता. पोलिसांना देखील प्रारंभी कुटुंबातीलच लोकांवर संशय होता. मात्र, नेमके संशयित आणि हत्येमागील कारण स्पष्ट होत नव्हते. गेली साडे तीन वर्षे पोलीस गोपनीयरित्या तपास करत होते. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि तरूणीच्या हत्येचा छडा लागला आहे.
अंधश्रध्देतून नातीचा नरबळी - भाग्यश्रीच्या आजीनेच नरबळी दिल्याची धक्कादायक बाब पोलीसांना तपासात समजले आहे. अंधश्रध्देतून भाग्यश्रीची हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आजीसह आणखी काही संशयीतांना ताब्यात घेतले आहे. आज दुपारी सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल या हत्येच्या गुन्ह्यामागील कारण, संशयीतांची नावे आणि तपासाची माहिती देणार आहेत. पाटण तालुक्याला हादरवणार्या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल सातारा पोलीस दलाचे कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा : Attempt to Break ATM : जिलेटीनच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; एका चोरट्यास अटक