ETV Bharat / crime

Mumbai Crime News : व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक; बाजारातील किंमत 2 कोटी 60 लाख रुपये - मरिन ड्राईव्ह पोलीस

मुंबई मरिन ड्राईव्ह पोलिसांनी व्हेल माशाची उलटी ( Whale Vomit ) म्हणजेच एम्बरग्रीस ( Ambergris ) विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तो एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी घेऊन हाॅटेल ऑबेरॉयसमोर विक्रीसाठी आला होता. याची खबर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून अगोदरच कळाली होती. त्यामुळे पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सापळा रचून त्याला अटक केली.

Mumbai Crime News
मुंबई गुन्हे वार्ता
author img

By

Published : Jul 21, 2022, 6:57 AM IST

मुंबई : मुंबईमध्ये व्हेल माशाची उलटी म्हणजेच एम्बरग्रीस ( Ambergris ) विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी वन विभागासोबत हॉटेल ओबेराय येथे सापडणार असून, दापोली येथील व्यक्तीला अटक केली आहे. या माशाची किंमत 2 कोटी 60 लाख रुपये इतकी असल्याचे बोलले जात आहे. आरोपी व्यक्तीला उद्या किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सापळा रचून आरोपीला अटक : दापोली येथील 25 वर्षीय आरोपी हा रहिवासी आहे. पोलिसांना एक इसम व्हेल माशाची उलटी घेऊन ती विक्री करण्याचे उद्देशाने ऑबेरॉय हॉटेलसमोर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकातर्फे ऑबेरॉय हॉटेलसमोर परिसरात पाळत ठेवण्यात आली. काही वेळाने गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे एका संशयित इसमास हटकले असता त्याचे ताब्यात प्रतिबंधित केलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजेच एम्बरग्रीस हा पदार्थ मिळून आला.

वन अधिकाऱ्यांकडून पदार्थाची तपासणी : त्याची वन अधिकारी यांनी पाहणी करून खात्री केली असता त्याचे एकूण वजन 2.619 ग्रॅम असल्याचे व त्याची किंमत 2 कोटी 60 लाख रुपये असल्याची समजले. सदर आरोपीला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास पोलीस करीत आहे. या पदार्थाचा वापर उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्यामध्ये करण्यात येत असून महारष्ट्र शासनाने या पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. तसेच या पदार्थाला बाजारात या पदार्थाला फार मागणी असल्याने याची किंमतदेखील खूप आहे.

या पदार्थाची किंमत इतकी का : याची बाजारात एवढी किंमत का असे जर विचारत असाल, तर त्याचे कारण असे आहे की, ह्याला कस्तुरीसारखा सुगंध असतो. तसेच हा एक दुर्मीळ मिळणारा पदार्थ आहे. हा द्रव पदार्थ जो व्हेल माशाच्या पित्ताशयात तयार होतो. हा द्रव पदार्थ तयार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागते. तसेच, या पदार्थाचा वापर सुंगधी द्रव तयार करण्यासाठी होतो. काही शास्त्रज्ञांच्या मते, व्हेल माशाने हा स्वीड ( एक समुद्री जीव ) खाल्यावर त्याची चोच व्हेल माशाला टोचू नये याकरिता व्हेल मासा आपल्याभोवती या द्रवाचे संचयन करतो. हे सुगंधी द्रव्य बाळगणे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे. तसेच हा पदार्थ तयार होण्यासाठी लागणारा काळ, त्याचा सुवास यामुळे त्याची बाजारात अनन्यसाधारण किंमत आहे. मध्ययुगीन काळात या पदार्थापासून प्लेगपासून संरक्षण होत असे असे मानले जाई. त्यामुळे हा पदार्थ दुर्मीळ असल्याने बाजारात याची किंमत खूप आहे.

हेही वाचा : Fraud of MLAs : शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाने 100 कोटींची मागणी; चारही आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.