ETV Bharat / crime

Osmanabad Froud Case : शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अखेर जेरबंद, बुलढाणा व परंडा पोलिसांची धाडसी कारवाई, - Fraud of crores of rupees to farmers

शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of crores of rupees to farmers) करुन फरार आरोपीला परांड्यातून ताब्यात घेतलं आहे. यावेळी आरोपीनं उकिरड्यात पुरुन ठेवलेली 42 लाख 11 हजार 920 इतकी रोकड जप्त केली आहे. तर या घटनेने परंडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Paranda Police
परंडा पोलिसांची धाडसी कारवाई,
author img

By

Published : Jul 16, 2022, 3:58 PM IST

उस्मानाबाद : ज्यादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांचे 3 कोटी 41 लाख 42 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे न देता फरार झालेला मुख्य आरोपी, संतोष रानमोडे यास बुलढाणा पोलीस पथकाने परंडा पोलिसांच्या मदतीने बावची तालुका परंडा येथून अटक (Arrested from Taluka Paranda) केले आहे. परंडा तालुक्यातील मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास अटक करून त्याने उकिरड्यात पुरलेली 42 लाख 11 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केले आहे.

यावेळी बुलढाणा पोलीसांनी (Buldhana Police) दिलेली माहिती अशी की, मुख्य आरोपी संतोष बाबुराव रानमोडे हा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील मूळ रहिवासी आहे. शेतकरी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष रानमोडे याचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पवित्रा ट्रेडिंग कंपनी नावाने धान्य खरेदी आडत दुकान होते.आरोपी संतोष रानमोडे याने अशोक समाधान मस्के, निलेश आत्माराम सावळे यांच्या मदतीने चिखली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना जादा दराने धान्य खरेदी करतो असे आमिष दाखवून शेतमाल खरेदी केला. व तुमच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवतो अशी थाप शेतकऱ्यांना मारली. मात्र शेतकऱ्यांना पैसे न देता घेतलेला माल विकुन तिघे आरोपी फरार झाले होते. शेतमाल विक्री केलेले पैसे खात्यावर न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच पवित्रा ट्रेनिंग कंपनीच्या धान्य खरेदी आडत दुकानदाराच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सुनील लक्ष्मणराव मोडेकर यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिल्याने मुख्य आरोपी संतोष रानमोडे, अशोक समाधान मस्के, निलेश सावळे,
यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमानुसार चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला होता.

आरोपी परंडा तालुक्यातील असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना (Buldhana Police Action) मिळाल्याने बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवणदत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक जायभाये, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद डोईफोडे, पोहेकॉ रामेश्वर मुंडे,पोहेकॉ सरदार बेग यांचे पथक मुख्य आरोपी संतोष रानमोडे याच्या तपासासाठी परंडा येथे दाखल झाले होते. परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, पोना बळीराम शिंदे, पोना. पायल पायाळ, पोलीस अंमलदार मनोज यादव यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन दिनांक (14 जुलै रोजी) रोजी परंडा तालुक्यातील बावची येथून मुख्य आरोपी संतोष रानमोडे यास त्याच्या बावची येथील नातेवाईकाच्या घरातून अटक केले आहे. आरोपीस घेऊन पोलीस चिखली कडे रवाना झाले आहेत. तर या घटनेने परंडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Kolhapur Crime News : कोल्हापुरात मोठी चोरी! मोबाईलचं अख्खं दुकानच केलं साफ; सीसीटीव्ही डिव्हीआरसुद्धा चोरले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.