जालना - तालुक्यातील एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देवीलाल सिल्लोडे यांची गावाजवळच ( village ) शेती आहे. या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले सराईत चोरटे असून, ते रात्री चोऱ्या करून आल्यानंतर लपून बसतात. तसेच या शेतात नियमितपणे हे शौचालयास बसत असत. या सर्व गोष्टींना सिल्लोडे कुटुंबातील ( family ) सदस्यांचा विरोध होता. ( Jalna Crime News )
परंतु, काल रात्री 8 वाजेच्या सुमारास शेतात शौचालयास विरोध केल्याच्या कारणावरून सिल्लोडे यांच्या कुटुंबाला 10 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत चाकूने भोसकले आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिल्लोडे कुटुंबाला तातडीने जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ( Jalna Crime News )मात्र तत्पूर्वीच, सुमनबाई देवीलाल सिल्लोडे ( वय- 55), आणि मंगेश देवीलाल सिल्लोडे ( वय - 25) या मायलेकाचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. तर देवीलाल सिल्लोडे आणि योगेश सिल्लोडे यांची प्रकृती गंभीर असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Jalna Crime News )
सेवली पोलिसांनी विजय शिंदे, सुधाकर शिंदे, शितल शिंदे, तुकाराम शिंदे, मुंगळया भोसले, छकुली शिंदे, रंजना पवार, सुरेखा शिंदे, चिंटू शिंदे आणि एक जाड व्यक्ती अशा 10 जणांविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, मौजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे पाटील, सेवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एन. उबाळे, परतुरचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे आदींनी रात्री तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे.
हेही वाचा - State Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक, शिंदे सरकारचा नामांतराचा पुन्हा निर्णय