आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील सर्व सदस्य अल्पवयीन आहेत. त्यांनी प्रथम विद्यार्थिनींशी मैत्री केली. त्यानंतर विद्यार्थिनींचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करून त्यांना ब्लॅकमेल केले. बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनी सुरुवातीला गप्प बसल्या. मात्र एका पीडित मुलीने तिचा अनुभव एका एनजीओला सांगितला. त्यानंतर त्या एनजीओने या टोळीची तक्रार पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करायचा : एनजीओचा दावा आहे की, टोळीतील अल्पवयीन आरोपीच्या मोबाईलमध्ये 300 हून अधिक महिला विद्यार्थिनींचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. या न्यूड फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ही टोळी विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून घाणेरडे काम करून घेत होती. हरिपर्वतचे एसीपी मयंक तिवारी यांनी सांगितले की, एका एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. याची चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी दिलेले पुरावे पाहण्यात आले. यानंतर सिकंदरा पोलीस ठाण्यात 20 ते 25 अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुरावे कसून तपासले जात आहेत. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.
अनोळखी नंबरवरून आला कॉल : शास्त्रीपुरम परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीने एनजीओकडे तक्रार केली होती. तिने सांगितले की 12वीचा एक विद्यार्थी तिचा प्रियकर होता. मैत्रीमुळे दोघेही अनेकदा भेटत असत. या दरम्यान प्रियकर खूप सेल्फी काढत असे. तो मोबाईलमध्ये व्हिडिओही बनवत असे. महिनाभरापूर्वी मला एका अनोळखी मोबाइलवरून कॉल येऊ लागले. फोन करणाऱ्याने त्याच्याकडे तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सांगितले. यामुळे ती घाबरली. विद्यार्थिनीने एनजीओला सांगितले की, जेव्हा तिने कॉलरला विचारले की तिला फोटो आणि व्हिडिओ कोठून मिळाले? तेव्हा त्याने तिच्या प्रियकराचे नाव घेतले. त्यानंतर विद्यार्थिनीने तिच्या बॉयफ्रेंडला फोन करून नग्न फोटो आणि व्हिडिओबद्दल विचारले, ज्याला त्याने स्पष्ट नकार दिला. यानंतर विद्यार्थ्यीनीला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून सतत कॉल येऊ लागले आणि तो तिला ब्लॅकमेल करून भेटायला बोलावू लागला.
अभ्यास चुकू नये म्हणून गप्प राहिली : एनजीओने सिकंदरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यात असे लिहिले आहे की, पीडित मुलीने ही गोष्ट तिच्या शाळेतील मैत्रिणीला सांगितली असता त्यांनाही असेच फोन येत असल्याचे कळले. बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनी फोन करणाऱ्याला भेटत होत्या. आपले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यास बदनामी होईल, अशी भीती विद्यार्थिनींना होती. घरचे त्यांना शाळेत पाठवणार नाहीत या भीतीने त्या गप्पच होत्या.
300 हून अधिक विद्यार्थिनींना ब्लॅकमेल : विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरटीआय कार्यकर्ते आणि इतरांनी आरोपी विद्यार्थ्याला पकडले आणि त्याची चौकशी केली. त्याच्या मोबाईलमध्ये 300 नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. यातील काही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना देण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या तावडीत 300 हून अधिक विद्यार्थिनी आणि तरुणी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोपींमध्ये एसएन मेडिकल कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याचा मुलगा असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. ही टोळी पॉर्न साइटला डेटा विकत असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
महिला आयोगातही तक्रार : स्वयंसेवी संस्थेच्या वतीने बाल आयोग, महिला आयोग तसेच अन्य ठिकाणी याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. महिला आयोग सक्रिय झाल्यानंतरच पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. महिला आयोग आणि बाल आयोगाकडे तक्रारीसोबत दिलेल्या कागदपत्रांमध्ये या टोळीतील विद्यार्थिनींसोबत अश्लील चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स, नग्न फोटो आणि इतर कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींना शारीरिक शोषण करायचे होते आणि नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर क्राईम सेल करत आहे तपास : सिकंदरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आनंद कुमार शाही यांनी सांगितले की, तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर क्राईम सेलची मदत घेतली जात आहे. प्राप्त माहितीची छाननी केली जात आहे. आरोपी विद्यार्थिनींचा डेटा दुसऱ्या मुलांकडे कसा पाठवायचा या बाबीची सायबर सेल तपास करत आहे. या टोळीच्या तावडीत किती विद्यार्थिनी आहेत याचीही चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : Thane Gang Rape : ठाकुर्लीतील खाडी किनारा परिसरात भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार