ETV Bharat / crime

Satara Crime : पाडळीतील शाळकरी मुलगा बेपत्ता; मिरारोड पोलीस तपासासाठी कराडात - Mumbai Crime

Satara Crime : कराड तालुक्यातील पाडळी गावातील अल्पवयीन शाळकरी मुलगा मुंबईतील मीरारोडमधून बेपत्ता झाला आहे. या घटनेची मीरारोड पोलीस ठाण्यात नोंद असून फेसबुकवरील संशयास्पद चॅटींगमुळे मुलाच्या बेपत्ता प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

Satara Crime
Satara Crime
author img

By

Published : Aug 2, 2022, 11:02 AM IST

सातारा - कराड तालुक्यातील पाडळी गावातील अल्पवयीन शाळकरी मुलगा मुंबईतील मीरारोडमधून बेपत्ता झाला आहे. या घटनेची मीरारोड पोलीस ठाण्यात नोंद असून फेसबुकवरील संशयास्पद चॅटींगमुळे मुलाच्या बेपत्ता प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे मीरारोड पोलीस या बेपत्ता मुलाचा शोध घेत कराडमध्ये पोहोचले आहेत. पाडळी गावातून माहिती घेऊन पोलीस मुंबईला रवाना झाले.

नातेवाईकांकडे गेलेला मुलगा बेपत्ता - कराडनजीकच्या पाडळी गावातील अल्पवयीन शाळकरी मुलगा मुंबईतील मीरारोडमध्ये राहणार्‍या नातेवाईकाकडे गेला होता. तेथून तो अचानक घरातून बेपत्ता झाला आहे. नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद मीरारोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. मुलाचे फेसबुकवरील चॅटींग संशयास्पद आढळून आल्यानंतर डीसीपी अमित काळे, पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू - बेपत्ता मुलाच्या तपासाच्या अनुषंगाने मीरारोड पोलिसांचे पथक कराडमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी पाडळी गावातील नातेवाईकांकडून त्याच्याबद्दलची माहिती घेतली. वेगवेगळ्या लोकांकडेही पोलिसांनी चौकशी करून मुलाबाबतची माहिती घेतली आहे. अल्पवयीन मुलगा नेमका कोणत्या कारणाने बेपत्ता झाला आहे, याचा तपास सुरू असून हे प्रकरण मीरारोड पोलीस गांभीर्याने हाताळत आहेत.

हेही वाचा - Monsoon Update : ऑगस्ट आणि सप्टेंबर 2022 मध्ये देशातील 'या' भागात ऊन तर 'या' ठिकाणी पडणार पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.