पुणे : पुणे येथील चंदननगरमध्ये तरुणीशी विवाह झाला नसतानासुद्धा तिच्याशी विवाह झाल्याच भास होण्यासाठी एकाने विविध कारनामे केले. तिच्याबरोबर विवाह झाल्याचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट ( Creat Fake Marriage Certificate ) आणि बनावट निकाल तयार करून ते व्हायरल केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीची समाजात बदनामी केली म्हणून तरुणासह त्याच्या मित्रांवर चंदननगर पोलीस ठाण्यात ( Chandannagar police station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिली पोलिसांत तक्रार : इम्रान समीर शेख (वय वर्ष 38) (रा. घोरपडी, विकासनगर पुणे) शेख खलील शेख जलील (इस्लामपूर तालुका आमदापूर जिल्हा बुलढाणा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 23 वर्षे तरुणीने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
आरोपीला करायचे होते पीडितेशी लग्न : संशयित आरोपी इम्रान शेख यांचे मॅरेज ब्युरो आहे. त्याला तरुणीसोबत विवाह करायचा होता. परंतु, त्याचे वय तिच्या वयापेक्षा अधिक असल्याने त्याच्याबरोबर विवाह करणे मान्य नव्हते. तरुणीचा विवाह झाला नाही हे इम्रानला माहीत होते. तरी तो तिच्यावर दबाव टाकत होता. पण, तरुणी काही केले तरी त्याच्यासोबत विवाह करण्यास तयार होत नव्हती. विवाहित नाही हे माहिती असतानादेखील इमरान यांनी आपल्या मित्रासोबत खालीलच्या मदतीने इमरान आणि या तरुणीचा निकाहनामा बनवला.
तरुणीचा आपल्यासोबत विवाह झाल्याचे भासवायचे होते : या तरुणीचा आपल्यासोबत विवाह झाला, असे दाखवण्यासाठी इम्रानने तिचा फोटो नाव टाकून आणि खोटी सही करून बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवले. तसेच, निकाहनामा फॉर्म तयार करून तो खरा असल्याचे भासविण्यासाठी त्याच्या समाजातील लोकांना कळावे यासाठी विविध मॅरेज ब्युरोंच्या ग्रुपवर टाकले. तसेच, फिर्यादी तरुणीच्या ओळखीच्या लोकांना ही बनावट कागदपत्रे पाठवून ती खरे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. हा बदनामीचा प्रकार तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार केली आहे.
तरुणीचा विवाह झालेला नव्हता : तरुणीचा विवाह झाला नसताना संशयित आरोपी आणि त्याच्यासाठी मित्रांनी हा फसवणुकीचा प्रकार केला आहे. यामध्ये बनावट निकाहानामा, बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून बदनामी केली असल्याचा प्रकार यामध्ये उघड होत आहे. याच तरुणीने इम्रान शेख विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.