ETV Bharat / crime

GJ Murdered for hands free : ब्लुटुथ न दिल्याने तरुणाने लोखंडी रॉड मारून दुकानदाराचा केला खून, न्यायालयाने ठोठावली दहा वर्षाची शिक्षा - न्यायाधिश गिरजा व्यास

ब्लुटूथ न दिल्याने दुकानदाराचा खून केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी तरुणाला अटक करुन न्यायालयात हजर केले. या आरोपीला न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधिश गिरजा व्यास यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

GJ Murdered for hands free
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2023, 7:51 PM IST

अहमदाबाद - ब्लुटूथ न दिल्याने दुकानदाराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा खून केल्याने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जगदिश चनाभाई परमार याने अनिल रामतेज चौरसिया यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाच्या न्यायाधिश गिरजा व्यास यांनी त्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

काय होते खून प्रकरण : शहरातील वज्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवा वडज येथे जगदीश चनाभाई परमारने ब्लुटूथ न दिल्याने दुकादार अनिल रामतेज चौरसियाला 24 फेब्रुवारी 2017 ला लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले होते. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या दुकानदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ब्लुटूथ न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन दुकानदाराचा खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली होता. याप्रकरणी वज्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयीत निखिल परमारला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

सरकारी वकिलांनी तपासले साक्षिदार : या खटल्यात सरकारी वकील दिलीपसिंह ठाकोर यांनी पुरेसे साक्षीदार तपासून कागदोपत्री पुरावे सादर केले. रस्त्यावर डोक्यावर लोखंडी रॉड मारून आरोपीने जिवे मारल्याचे सिद्ध झाल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. गुन्हा सिद्ध झाल्यावर आरोपीला कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी त्यांनी केली. हा खून भर रस्त्यात झाल्यामुळे शहरात दहशत निर्माण झाल्याचे सरकारी वकील ठाकोर यांनी याबाबत न्यायालयाचे लक्ष वेधले. शहरातील गुंडांची दहशत कमी करण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली.

वडोदरा शहरात याअगोदरही झाले खून : शहरात या अगोदरही अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र अशा आरोपींना न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावल्यास गुन्हेगारीवर आळा बसेल. या घटनेतील आरोपी परमारची पोलिसांनी कसून चौकशी केली. योग्य ते पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. आता पोलिसांनी शहरात गुंडांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी सुरू केली मोहीम शहरात सुरू झालेल्या खुनाच्या घटनावरुन पोलिसांनी सावकारी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासह पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासही सुरूवात केली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हे कमी होण्यास मदत होईल. क्षुल्लक कारमामुळे दुकानदाराचा खून केल्याच्या घटनेने मात्र शहरात दहशत निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.