ETV Bharat / crime

Pune Sassoon Hospital Crime : हिंदूराष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला; पोलीस कर्मचारी गंभीर जखमी - Tushar Hambir at Sassoon Hospital Attack

पुण्यातील ससून रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंदुराष्ट्रसेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर रुग्णालयात घुसून तीन ते चार जणांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Pune Sassoon Hospital Crime
हिंदूराष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला
author img

By

Published : Sep 6, 2022, 10:32 AM IST

पुणे : पुणे शहरात गणेश उत्सवाची धुमाकूळ सुरू असताना पुण्यातील ससून रुग्णालयात ( Pune Sassoon Hospital Crime ) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंदुराष्ट्रसेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर रुग्णालयात घुसून तीन ते चार जणांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

हंबीर याला उपचारासाठी आणले होते ससूनमध्ये : ही घटना सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयात घडली आहे. खून आणि अनेक गंभीर मोक्काच्या गुन्ह्यात तुषार हंबीर अनेक वर्षे येरवडा कारागृह होता. दहा दिवसांपूर्वी हंबीर याच्यावर उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

फायरिंग चुकली म्हणून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न : उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधून हंबीर याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात आलेल्या अज्ञात दोघाजणांनी हंबीर याच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. फायरिंग चुकली असता हल्लेखोराने कोयत्याने वार करीत हंबीर यांच्यावर खुनी हल्ला केला. यावेळी हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ससूनसारख्या सर्वोच्च रुग्णालयात खुनीहल्ला झाल्याने हाॅस्पिटलसह शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

बहाणा करून हे हल्लेखोर आतमध्ये आले : तुषार हंबीरला हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी आल्याचा बहाणा करून हे हल्लेखोर आतमध्ये आले होते. फायरींग करण्याचा प्रयत्न करून खुनी हल्ला करीत असताना पोलिस कर्मचारी अमोल बगाड याने हल्लेखोराना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात बगाड हे जखमी झाले आहेत. तुषार हंबीर याच्यावर यापूर्वी येरवडा कारागृहातदेखील हल्ला झाला होता.

हेही वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.