ETV Bharat / crime

Ahmednagar Crime: कोट्यवधींचे हस्तीदंत जप्त, ६ तस्करांना अटक - अटक

औरंगाबाद महामार्गावर जेऊर टोलनाका येथे हस्तीदंतांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोलनाका परिसरात सापळा रचला होता. सापळा रचून पोलिसांनी आरोपींना पकडले आहे.

Ahmednagar Crime
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर
author img

By

Published : Jul 2, 2022, 3:06 PM IST

अहमदनगर - अहमदनगर ( Ahmednagar ) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोट्यवधी रुपयांचे बाजारमूल्य असलेले हस्तीदंत अर्थात हत्तीचे दात जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात 6 तस्करांना पोलिसांनी (Police to smugglers ) अटक केली आहे. औरंगाबाद महामार्गावर ( Aurangabad Highway ) जेऊर टोलनाका येथे हस्तीदंतांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोलनाका परिसरात सापळा रचला होता. सापळा रचून पोलिसांनी व्यंकटेश दुरईस्वामी ( वय- 40 ) हल्ली रा. वाकोडी फाटा, दरेवाडी, ता. जि. अहमदनगर, महेश बाळासाहेब काटे ( वय- 30 ) रा. आखेगांव, ता. शेवगांव, महेश भगवान मरकड( वय- २६) रा. गहिलेवस्ती, ता. शेवगांव, सचिन रमेश पन्हाळे ( वय- 33 ) रा. आखेगांव, ता. शेवगांव, निशांत उमेश पन्हाळे ( वय- 25 ) रा.भगतसिंग चौक, शेवगांव, संकेश परशुराम नजन ( वय- 23 ) रा. पवारवस्ती शेवगांव अशा 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बहुमुल्य शोभेच्या वस्तु व औषधे या करिता हस्तीदंत तस्करी करणारी टोळी हस्तीदंत व चारचाकी वाहनासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याच हत्तीदंताची तस्करी चक्क अहमदनगर येथे होतं होती. मात्र, पोलिसांनी हत्तीदंत जप्त करून मोठ्या शिताफिने आरोपींना अटक ( Accused Arrested ) केली आहे. दरम्यान हे हत्तीदंत आरोपींनीं कुठून आणले, त्यांच्या टोळीत आणखी किती सदस्य आहेत? याबाबत पोलीस कसून तपास करत आहे. तस्करांशी संबंधित व्यक्ती सरकारी यंत्रणेत आहेत की नाही याची पण चौकशी सध्या सुरू आहे.

हेही वाचा - मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.