ETV Bharat / crime

Sunanda Shetty Got Bail : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टीला फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Bollywood Actress Shilpa Shetty ) यांची आई सुनंदा शेट्टी यांना अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला ( Sunanda Shetty Got Bail ) आहे. २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टीला फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर

author img

By

Published : Apr 12, 2022, 10:54 PM IST

मुंबई- अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ( Bollywood Actress Shilpa Shetty ) आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला ( Sunanda Shetty Fraud Case ) होता. या प्रकरणात सुनंदा शेट्टी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालय जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आज अंधेरी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला ( Sunanda Shetty Got Bail ) असून, त्यांच्याविरोधात काढण्यात आलेले जामीनपात्र वॉरंट देखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सुनंदा शेट्टी यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे.

वारंवार गैरहजर : फसवणूक प्रकरणात सुनंदा शेट्टी यांना कोर्टासमोर हजर राहण्यास वारंवार समन्स पाठवण्यात आले होते. मात्र तरीदेखील सुनंदा शेट्टी न्यायालयासमोर हजर होत नसल्याने त्यांच्या विरोधात मागील महिन्यात जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. तसेच त्यांना 12 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्यानुसार सुनंदा शेट्टी स्वतः अंधेरी महानगर न्यायालयासमोर हजर झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना न्यायालयाकडून जामीन देखील देण्यात आला असून, त्यांच्या विरोधात काढण्यात आलेले जामीनपात्र वॉरंटदेखील रद्द करण्यात आले आहे.

शिल्पा शेट्टीही सहआरोपी : फसवणूक प्रकरणात तक्रारदाराकडून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी यादेखील सह आरोपी होत्या. मात्र दिंडोशी सत्र न्यायालयाने या दोन्ही बहिणींना तात्पुरता दिलासा दिलेला आहे. सखोल चौकशी केल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी यांची काय भूमिका याची चौकशी निष्पन्न झाल्यानंतर कारवाई करण्यात यावी. तोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले होते. त्यावेळी शिल्पा शेट्टी यांनी न्यायालयात सांगितले होते की, फसवणुकीची तक्रार दाखल केली ती फक्त प्रसिद्धीसाठी आणि माझी बदनामी होण्याच्या हेतूने करण्यात आली आहे. या प्रकरणात माझा कुठलाही संबंध नाही, असे शिल्पा शेट्टीने न्यायालयात सांगितले ( Fraud Case Against Actress Shilpa Shetty ) होते.

२१ लाखांची आहे फसवणूक : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी यांनी परहड आमरा नामक व्यक्तींची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कारवाई सुरू केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रक्रिया जारी केली आणि शिल्पा शेट्टी त्यांच्या आई आणि बहिण शमिता शेट्टी तिघांना समन्स बजावले होते. त्यांच्या विरोधात कलम 406, 420 आणि 34 अंतर्गत चौकशी सुरू होती.

काय आहे प्रकरण : परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने तिघांविरुद्ध लॉ फर्म मेसर्स वाय अँड ए लीगलमार्फत त्यांची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांनी 21 लाखांचे कर्ज फेडले नाही. जे शिल्पा आणि शमिताचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी घेतले होते. त्यानंतर तक्रारदाराने जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार पाठवली. जिथे पीडिताला दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात कोर्टात खासगी तक्रार दाखल केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.