नागपूर - रेल्वेच्या स्वच्छतागृहातील नळाच्या तोट्या चोरणाऱ्या एका चोरट्यास आरपीएफच्या ( Railway Protection Force ) जवानांनी रंगेहाथ अटक केली आहे. चोरलेल्या तोट्या तो विकत होता व त्यातून मिळणाऱ्या पैशाने तो आपले चोचले पूर्ण करत होता. सिकंदर जाहिद खान, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यासह ज्याला त्याने तोट्या विकल्या होत्या त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून रेल्वेच्या अनेक बोगीतील नळ चोरीला जात असल्याने आरपीएफचे जवानही बुचकळ्यात पडले होते. दिवसागणिक नळ चोरीला जाण्याचे प्रमाण वाढतच होते. त्यामुळे नळ चोराला अटक करण्यासाठी अखेर आरपीएफ पथकाला रेल्वे स्टेशनवर साध्या वेशात अनेक कर्मचारी नियुक्त करावे लागले होते. सिकंदर जाहिद खान हा नागपूर रेल्वे स्थानकात ( Nagpur Railway Station ) थांबणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेच्या स्वच्छतागृहात जात असल्याचे निदर्शनास येताच आरपीएफ जवानांनी त्याची विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर देत होता. त्यानंतर आरपीएफ जवानांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ नळाच्या अनेक तोट्या आढळल्या. त्यामुळे त्याला आरपीएफ जवानांनी अटक केली.
चोरट्याकडून 55 तोट्या जप्त - आरोपीने एक दोन नव्हे तर तब्बल 100 पेक्षा अधिक तोट्या चोरल्याची माहिती पुढे आली आहे. प्राथमिक तपासात त्याच्याकडून 55 नळ तोट्या जप्त करण्यात आले ( Plumbing Tap Seized ) आहेत. त्याने ज्याला चोरीचे नळ तोट्या विकल्या होत्या त्यालाही पोलिसांनी अटक केली ( Accused Arrested ) आहे.
हेही वाचा - Arrested with Gold Biscuits : नागपूर रेल्वे स्थानकातून सोन्याच्या बिस्कीटासह एकाला अटक