ठाणे - मागील काही दिवसांपासून गरजूंना अन्नदान करणाऱ्या लोकांनी आता पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला आहे. पोलीस स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमुळे झाडांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली दिसल्यावर वर्तक नगर येथील काही युवकांनी संपूर्ण पोलास स्टेशन फवारणी करून सॅनिटाइज करण्याचा प्रयत्न केलाय.
पोलीस स्टेशन, संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करून घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून याआधी या पोलीस स्टेशनमधील तीन कर्मचारी हे कोरोनाबाधित झालेले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करणे गरजेचे होते.
युवकांच्या उत्साही कामामुळे पोलिसांनीदेखील त्यांचे आभार मानले आहेत. वर्तक नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले असून महापालिकेकडून हा परिसर रेड झोन म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे. अष्टविनायक सामाजिक संस्था व एकता रहिवासी को. औ. हौ. सोसायटीतर्फे जंतुनाशक फवारणी केली गेली.