ETV Bharat / city

ठाण्यातील चेंबरमध्ये पडली महिला..  ठेकेदारावर गुन्हा दाखल - thane accident news

ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात रस्त्यावरील चेंबर तुटल्याने एक महिला त्यामध्ये पडली. यानंतर स्थानिकांच्या मागणीनुसार संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे.

thane accident news
ठाण्यातील चेंबरमध्ये महिला पडली..अखेर ठेकेदारावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 4, 2020, 1:27 PM IST

ठाणे - लोकमान्यनगर येथील रस्त्यावरील चेंबर तुटून महिला जखमी झाली. या प्रकरणी, महिलेच्या तक्रारीवरून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील चेंबरमध्ये महिला पडली..अखेर ठेकेदारावर गुन्हा दाखल

शहरातील डवलेनगर परिसरात राहणाऱ्या प्रीती सिंग (वय - 26) या भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी लोकमान्यनगर बस डेपोकडून यशोधननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत असताना या रस्त्यावर जवळपास 5 फूट खड्डा पडला असल्याचे प्रीती यांच्या लक्षात आले नाही. यामुळे त्या खड्ड्यात पडल्या. प्रीती यांनी खड्ड्यातून आवाज दिला; आणि रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनी त्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. प्रीती यांना जबर मुक्का मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेच्यावतीने अशा प्रकारे रस्त्याचे नित्कृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लावून धरली होती. त्यानंतर या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या अज्ञात ठेकेदारावर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सुरू असून लवकरच ठेकेदाराला चौकशीसाठी बोलवण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.