ठाणे - वडिलोपार्जित मालमत्तेच्या लालसेपोटी पत्नीने मुलासह नातेवाईकांच्या मदतीने पतीला दहा दिवस घरात डांबून ठेवले. या पीडित व्यक्तीला नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित व्यक्तीची पत्नी दुर्वा सुरेश पावशे, मुलगा निखील पावशे, पुतण्या स्वप्नील पावशे व भाचा पुष्कर सुतार यांना अटक केली आहे
कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात राहणारे सुरेश पावशे यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता आणि पैसा अशी लाखोंची मालमत्ता आहे. ही मालमत्ता द्यावी, यासाठी सुरेश यांची पत्नी, मुलगा, पुतण्या आणि भाचा सतत मागणी करीत होते. मात्र, सुरेश हे त्यांना नकार देत होते. याच वादातून सर्व आरोपींनी सुरेश यांना 10 दिवस घरात डांबून ठेवत बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांनी सांगितले.
हेही वाचा-पुण्यात पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेने केली आत्महत्या
याप्रकरणी सुरेश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान मालमत्तेच्या हव्यासापोटी घडलेल्या या घटनेमुळे शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा-प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा दीराच्या मदतीने पत्नीने केला खून