ETV Bharat / city

Jitendra Awhad On OBC : ..तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का ठरवत नाहीत : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा सवाल - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का ठरवत नाही

इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ओबीसी समाज ठरवत असतो, मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ( Chief Minister Of Maharashtra ) ओबीसी का ठरवत नाहीत, असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला ( Jitendra Awhad On OBC ) आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Feb 13, 2022, 5:45 PM IST

ठाणे : राज्यातील ओबीसी आरक्षणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. इतर राज्यात मुख्यमंत्री कोण व्हावा हे ओबीसी समाज ठरवत असतो, मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ( Chief Minister Of Maharashtra ) ओबीसी का ठरवत नाहीत असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित ( Jitendra Awhad On OBC ) केला. ठाण्यात रविवारी टीप टॉप प्लाझा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलवतीने ओबीसी राज्यस्तरीय शिबिराचे ( OBC State Level Camp ) आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राज्याच्या विविध ठिकाणाहून ओबीसी समाजाचे नेते, प्रवक्ते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समजावर झालेल्या अन्याय आणि इतर विषयावर आपले मत मांडत वरील विधान केले.

..तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का ठरवत नाहीत : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा सवाल

आजोबा हमाल, मला अभिमान वंजारी असल्याचा

जितेंद्र आव्हाड यांनी आज कार्यक्रमात बोलताना माझे आजोबा व्हिटी स्थानकात हमालीचे काम करत होते. अनेक हमाल तेव्हा वंजारी समाजाचे होते, त्याचा मला अभिमान आहे असे आव्हाड यांनी सांगितले. घर छोटे असल्यामुळे माझे वडील 22 वर्ष व्हिटी स्थानकातच झोपत असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांची मेहनत दिवस रात्र सुरू होती शिक्षण घेत असताना सकाळी उठून आईला मदत करायला भाजी घेऊन विक्रीसाठी भायखळाला जात असत. त्यासोबत अरुण गवळी यांच्या वडिलांच्या दारूच्या अड्ड्यावर माझ्या वडिलांनी लहानपणी पैसे मोजण्याचे काम केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी राज्यस्तरीय शिबिरात हा गौप्यस्फोट केला आहे. ओबीसी राज्यस्तरीय शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी आजोबा आणि वाडीलांच्या संघर्षाची कहाणी सांगितली.

माझ्या आईला सत्यनारायण पूजेला बोलावत नव्हते

मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये असलेल्या सत्यनारायणाच्या पूजेला माझ्या आईला वर्षानुवर्ष कधीच बोलवलं नाही याचं दुःख मला आजही आहे अशी भावना ओबीसी राज्यस्तरीय शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त करून दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.