ETV Bharat / city

पाणी कपातीची चिंता मिटणार, धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ

काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता मिटणार असल्याचे चित्र आहे.

author img

By

Published : Aug 17, 2020, 1:06 PM IST

heavy rain in thane
पाणी कपातीची चिंता मिटणार...धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता मिटणार असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी ठाणे, कल्याण डोंबीवलीसह मुंबईला पाणी पुरवठा करणारी बारवी धरण, आंध्र, मोडक सागर ही धरणे १०० टक्के भरली होती. तर भातसा, तानसा आणि मध्यवैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते. गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्यामुळे सर्व धरणे ऑगस्ट महिना संपण्याआधी भरले होते. यंदा पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पाणी समस्येची चिंता आता काही अंशी कमी झाली आहे. निवासी भागात पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे.

heavy rain in thane
ल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे.

बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात रविवारपर्यंत सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी, खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पावसाची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होता. बारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात येणार आहे.

त्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. अजून साडेतीन मीटर पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर या पाण्याचा विसर्ग होणार आहे. बारवी प्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. आज धरणात ३८ मिमी पाऊस पडला आहे, तर आंध्र धरणात यंदा प्रथमच आज ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणी साठा झाला आहे. मोडक सागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडलाय. आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसा धरणात २१ मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणीसाठा आहे. वैतरण धरणात आज ५० मिमी पाऊस पडल्याने धरणात आता ८२ टक्के पाणीसाठ्याचे संकलन झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात या पावसाच्या रिपरिपमुळे रविवारपर्यंंत सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी, कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२ मिमी पाऊस पडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.