ठाणे - भांडी घ्या भांडी, असा आवाज देत शहरभरातून जुने कपडे गोळा करून त्यावर आपला चरितार्थ चालवणाऱ्या वाघरी समाजातील लोकांची कोपरी येथील 5 दशक जुनी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आजही गरिबांना कपडे देण्याचे काम करत आहे. जुने कपडे देऊन हवे ते भांडे घ्यायचे हा ‘लेनदेन’चा मामला येथे पार पडतो. पण मग जुन्या कपड्यांचे काय होते, असा प्रश्न कधी तरी तुम्हाला पडला असेलच. याचे उत्तर हवे असेल तर ठाण्यातल्या जुन्या कपड्यांच्या बाजाराला भेट दिल्यावर हा व्यवसाय काय आहे? याचा अंदाज आपल्याला येईल.
हेही वाचा - Rape Of Minor Girl : अल्पवयीन पुतणीवर काकासह मुलाचाही बलात्कार
जुने, फाटलेले, शिलाई उसवलेले, वापरून वापरून कंटाळा आलेले कपडे देवून अनेक लोक या विक्रेत्यांकडून भांडी घेतात. आजही आपल्या पुरातन अशा बार्टर सिस्टमचा हा एक भाग आहे. जुन्या काळात हा देवानघेवानीचा प्रकार चलनी नोटा नानी नसताना वापरला जायचा. त्या काळात सर्व व्यवहार याच पद्धतीने होत असत. कालांतराने चलनी नोटा आल्यावर ही प्रथा बंद झाली. कपड्यांच्याबाबतीत आजही ही प्रथा ठाण्यात पाहायला मिळते.
या व्यवसायाचा दिवस सुरू झाल्यावर बाजार लागतो. या बाजारात हजारो विक्रेते आपल्याकडील कपडे बाजारात विकतात. या बाजाराला कपडा बाजार किंवा चिंधी बाजार असेही म्हणतात. ज्यांना नवीन कपडे घेणे परवडत नाही असे लोक येथे कपडे विकत घेतात. त्यांच्यासोबत मोठ मोठे व्यापारी देखील हे कपडे घेतात. फडकी बनवून कपड्यांची गोधडी बनवणारे गेरेज मधे लागणारे कपडे, असा या जुन्या कपड्यांचा वापर होतो. अगदी 5 रुपयांपासून 500 रुपंयापर्यंत येथे कपडे विकले जातात. कपड्याच्या दर्जावर किम्मत अवलंबून असते. विक्रेत्यांना किरकोळ फायदा असतो, पण पारंपरिक व्यवसाय असल्याने हजारो कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत.
कोपरीमधील वाघरी वाडा नामशेष - हा व्यवसाय करणारा मुख्यत्वे समाज वर्षानुवर्षे पिढीजात कपड्यांचा व्यवसाय करत आहे. या व्यवसायात फारसे उत्पन्न नसल्यामुळे या समाजाने आता इतर व्यवसाय, नोकरीधंदा यावर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. हा व्यवसाय आता पहिल्यासारखा राहिला नसल्यामुळे या व्यवसायामध्ये युवक फारसे लक्ष देत नाहीत. कोपरीमधील या कपडा बाजारामुळे या परिसरात असलेले हॉटेल व्यावसायिक, भांडी विक्रेते आणि इतरही किरकोळ व्यवसाय नावारुपास आले आहेत. कपडा बाजाराशी संलग्न असणाऱ्या अनेक व्यवसायांमुळे येथील रोजगाराचा प्रश्न कमी झाला असला, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामुळे कपडा व्यवसाय आजही तग धरून राहिला आहे.
ग्राहक व्यापारी दुरून येतात - सकाळी सुरू होणाऱ्या या व्यवसायासाठी विक्रेते आणि ग्राहक हे फार दुरून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अगदी नाशिक, भिवंडीपासून व्यापारी या ठिकाणी कपडे घेण्यासाठी येतात. थोडासा फायदा मिळवून ते आपला व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. चिंधी बाजारात दररोज हजारो ग्राहक आणि विक्रेते आपला व्यवसाय करतात. या बाजाराचा टर्नओवर करोडोच्या घरात आहे. दररोज सकाळी दोन तासांसाठी सुरू असलेला हा बाजार हजारो कुटुंबीयांना व्यवसायाचे साधन आहे. त्यामुळे, हे विक्रेते खरेदीदार आणि व्यापारी असा मिळून करोडो रुपयांची उलाढाल दररोज कोपरीमध्ये पाहायला मिळते.
हेही वाचा - Divya Pavle Success : कर्करोगाशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत दिव्या पवळेचे यश, जिद्दीवर मिळवले 81 टक्के