ठाणे - 'व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस प्रेमीयुगल आणि तरुण मंडळींसाठी अत्यंत खास दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या प्रिय व्यक्तीला प्रेम करून भेटवस्तू दिल्या जातात. तसेच हा दिवस जोडप्यासाठी विशेष असल्याने प्रेमाच्या नात्याची आठवण म्हणून लग्नगाठ बांधत असतात. 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी ( Register marriage on Valentine day ) ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात तब्बल 40 जोडप्यांनी रजिस्टर मॅरेज करून आठवणींचे कोंदण करून घेतले आहे.
Marriage on Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'ला लग्नाच्या बेडीत अडकली 40 जोडपी! - व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडपी अडकली लग्न बंधनात
14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी ( Register marriage on Valentine day ) ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात तब्बल 40 जोडप्यांनी रजिस्टर मॅरेज करून आठवणींचे कोंदण करून घेतले आहे. दरम्यान मागच्या वर्षी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नोंदणीकृत कार्यालयात विवाह करणाऱ्यांचा मुहूर्त हुकला होता. परंतु यंदा 14 तारखेला सोमवार आल्याने ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधून नोंदणीकृत विवाह करण्यासाठी 40 हून अधिक जोडप्यांनी नावनोंदणी केली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी अधिकारी पार्वती कळपगार यांनी बोलताना सांगितले.
Marriage on Valentine Day