ठाणे - उत्तरप्रदेश सरकारने ५० हजार रूपये इनाम घोषित केलेल्या दरोडयातील आरोपीस ठाणे पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टँडजवळ सापळा रचून अटक केली आहे.
उमर उर्फ उमर अहमद पुत्र अतीकुर्रहमान उर्फ अब्दुलरहमान शेख (वय ३२) याच्यावर उत्तरप्रदेश मधील आजमगढ येथील फुलपूर पोलीस स्टेशनमध्ये दरोडेखोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी उमर हा फरार होता. त्याला पकडण्यासाठी आजमगढ पोलिसांनी ५० हजार रुपये इनाम घोषित केला होता.
गुप्त माहितीमुळे कारवाई -
उमर हा ठाणे परिसरात राहत असल्याची माहिती उत्तरप्रदेश एस.टी.एफ. पोलिसांना मिळाली होती. आरोपी उमरला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ठाणे पोलिसांना लेखी रिपोर्ट देऊन मदत मागितली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युनिट -१ ला उत्तरप्रदेशमधील अजमगडचे पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रकुमार यांना मदत करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे फरार आरोपीस पकडण्यासाठी एस.टी.एफ. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव व स्टाफ यांनी आरोपीची माहिती काढली. त्यांनतर त्यांना आरोपी हा ठाणे रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टॅडंजवळ सापळा लावून फरार आरोपीस ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी एस.टी.एफ.उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.
उत्तर प्रदेशमधील दरोडेखोरास ठाण्यात अटक
उत्तर प्रदेशमधून फरार असलेला कुख्यात आरोपी उमर उर्फ उमर अहमद पुत्र अतीकुर्रहमान उर्फ अब्दुलरहमान शेख (वय ३२) याला ठाणा स्टेशनच्या बाहेर सापळा रचून अटक केली. उमर अहमद यांच्यावर यूपीमध्ये 50 हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. यूपीतील आझमगडमध्ये फुलपूर पोलीस ठाण्यात उमर अहमद याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.