ठाणे - शहरातील कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडर वर कोपरी बस स्थानक परिसरात जीवघेणा हल्ला झाला असून, चार अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे.
बाबू नाडरवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पोलीस कोठडीत पोलिसांनाच मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे.
दररोज लाखो रुपयांच्या उलाढालीमुळे त्याच्याकडे अनेक गुंड, राजकीय पुढारी तसेच पोलीस कर्मचारी हफ्ता मागण्यासाठी येत असतात. हफ्ते मिळण्याच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच पूर्ववैमनस्यातून काही अल्पवयीन मुलांनी हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बाबू नाडरला शहरातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. कोपरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बसस्थानकाजवळ झालेल्या प्रकारामुळे कोपरी परिसरात दहशत पसरली आहे.