ETV Bharat / city

Handicap Three wheeler : ठाण्यातील 17 वर्षाच्या भाविकने बनवली अनोखी तीन चाकी गाडी, अपंगांना होणार मदत - तीन चाकी गाडी भाविक वैती बातमी

बारावीत शिकणाऱ्या एका युवकाने ( Youth Made Three wheeler For Handicap ) अपंगांसाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी व्हिलचेअर गाडी बनवली आहे. या गाडीला स्पेशल हॅन्डीकॅप गाडी ही आपण म्हणू शकतो. ही गाडी बनण्यात फक्त १८ हजार रुपये खर्च झाले असून, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या आत्ताच्या युगात अपंगांना या वाहनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Handicap Three wheeler
Handicap Three wheeler
author img

By

Published : May 26, 2022, 7:15 PM IST

ठाणे - बारावीत शिकणाऱ्या एका युवकाने ( Youth Made Three wheeler For Handicap ) अपंगांसाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी व्हिलचेअर गाडी बनवली आहे. या गाडीला स्पेशल हॅन्डीकॅप गाडी ही आपण म्हणू शकतो. ही गाडी बनण्यात फक्त १८ हजार रुपये खर्च झाले असून, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या आत्ताच्या युगात अपंगांना या वाहनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना वाहन चालवण्यास लागणारे कष्ट ही कमी होणार आहेत. भाविक वैती या तरुणाने ही किमया करून दाखवली असून, असे जवळपास १०० हून जास्त प्रोजेक्ट त्याने तयार केले आहेत.

प्रतिक्रिया

एकीकडे इंधनचे दरवाढ दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची वाहन रस्त्यावर येत आहेत. त्यात सध्या बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. परंतु अपंगांना त्याच्या सोयीप्रमाणे वाहन बनवण्याचा विचारदेखील कोणी करताना दिसत नाही. सध्याच्या घडीला अपंगांसाठी अनेक वाहन आहेत. मात्र, ती चालवण्यासाठी त्यांना हाताचा उपयोग करावा लागतो. त्यात त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि हेच कष्ट ठाण्यातील तरुणाला पाहवले गेले नाही आणि भाविक वैती या १७ वर्षीय बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या तरुणाने ठरवले या अपंग व्यक्तींना त्यांच्या वाहन चालवण्यासाठी होणाऱ्या त्रासासाठी काही तरी कराव आणि त्याने यांच्यासाठी स्पेशल तीन चाकी व्हिलचेर वाहन बनवलले. ही तीनचाकी अशी बॅटरीवर चालणारी गाडी आहे. जी जवळपास ३ तास चार्ज केल्यावर २० ते २२ किलोमीटर चालते आणि ही गाडी चालवताना अपंग व्यक्तीला आपल्या हाताचा उपयोग करावा लागणार नाही आणि फक्त १८ हजार रुपये खर्च करून ही गाडी भाविकने बनवली आहे. या आधी या युवकाने जवळपास असे १०० प्रोजेकट बनवलेत, त्यात त्याने पेट्रोलवर चालणारी सायकल सुद्धा बनवली आहे. या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या युगात अपंगांना या अपंग स्पेशल वाहनांमुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांचे वाहन चालवण्यास लागणारे कष्ट ही काहीसे कमी होताना पाहता येतील, अस भाविक आवर्जून सांगतो.

लहानपणापासून आवड - लहानपणीच भाविक हा खेळण्यासाठी घेऊन दिलेल्या गाड्या खोलायचा आणि त्या पुन्हा बनवायचा. यामुळेच आम्हाला कळल की पुढे भाविकला असे काही प्रोजेक्ट बनवण्यात उत्सुकता असणार आणि आम्ही त्याला पाहिजे तसा पाठींबा दिला, एवढ्या लहान वयात त्याने, असे वाहन बनवले आहे म्हणून आम्हाला त्यावर अभिमान आहे, अस भाविकच्या आईवडिलांनी सांगितले.

अपंगांसाठी विशेष प्रेम - भाविकने आपल्या अपंगांच्या प्रेमापोटी या आधी अंध छडी ही बनवली आहे. सोबत त्याने पेट्रोलच्या मदतीने चालणारी सायकल देखील बनवली आहे. पण त्याने बनवलेल्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये अपंगाबद्दल त्याचे विशेष प्रेम दिसते. कारण त्याने अपंगांना होणारा त्रास पाहिला आहे. त्यांना काहीतरी अडचणी सोडवण्यासाठी त्याचा प्रयत्न आयुष्यभर राहिल, असे त्याचा आत्माविश्वास आहे. भाविकच्या या हॅन्डीकॅप स्पेशल वाहनाची दखल संबंधित प्रशासनाने घेतली. तर नक्कीच अपंग वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या वाहनातील काही त्रुटी असतील तर संबंधित विभागाने त्या दूर करून एक चांगली स्पेशल हॅन्डीकॅप गाडी अपंगांना मिळू शकते.

हेही वाचा - Kirit Somaiya : 'अनिल परब गजाआड जातील, सोबत आणखी चौघांचा...'; किरीट सोमैयांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.