ETV Bharat / city

बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता मृत पक्षांसाठी ‘दफनभूमी’ची अनोखी मागणी - thane bird flu news

अत्यंत संवेदनशील असलेल्या या मुद्यावर महानगरपालिका क्षेत्रात मृत प्राणी, पक्षांसाठी अधिकृत दफनभूमी तयार करण्याची मागणी पक्षीमित्रांची संस्था असलेल्या इकोड्राईव्ह यंगस्टर फाउंडेशनने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवदेनाद्वारे केली आहे.

bird flu
bird flu
author img

By

Published : Jan 12, 2021, 7:29 PM IST

ठाणे - देशासह राज्यात बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रात मृत प्राणी, पक्षांसाठी दफनभूमीची मागणी पुढे आली आहे. विशेष म्हणजे बहुधा राज्यातील पहिलीच मागणी असून मृत पक्षासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत दफनभूमी नसल्याने कोणत्याही दुर्घटनेत मृत पावलेल्या प्राणी आणि पक्षांना इतरत्र किंवा रस्त्यांच्या कडेला किंवा अडगळीच्या ठिकाणी फेकून दिले जाते. त्यामुळे अश्या अत्यंत संवेदनशील असलेल्या या मुद्यावर महानगरपालिका क्षेत्रात मृत प्राणी, पक्षांसाठी अधिकृत दफनभूमी तयार करण्याची मागणी पक्षीमित्रांची संस्था असलेल्या इकोड्राईव्ह यंगस्टर फाउंडेशनने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवदेनाद्वारे केली आहे.

दुसरा बर्ड फल्यूसारखा प्रकार?

बर्ड फल्यूच्या साथीने देशासह राज्यातही पक्षी दगवल्याच्या घटना समारे येत असतानाच कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील गौरीपाडा प्रभागात नियोजित सुरू असलेल्या सिटी पार्क प्रकल्पानजीक सोसयटी रस्त्यावर दोन खारमिला (ढोकरी) प्रजातीचे पक्षी मृतावस्थेत आढळले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात याच परिसरात पाच ते सहा बगळे मृतावस्थेत आढळून आले होते. आठवड्याभरात दुसरा बर्ड फल्यूसारखा प्रकार समोर आला आहे. आता हे पक्षी बर्ड फ्ल्यूने मृत्यूमुखी पडले की काय, असा प्रश्न पडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मृत पक्षी आढळलेल्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी

मंगळवारी दुपारच्या सुमारास गौरीपाडा प्रभागातील गुरूअत्मन सोयटी ३६०सर्कल डी. बी. स्कूल रस्त्याच्या लगत दोन पक्षी मृतावस्थेत पडलेले स्थानिक रहिवासी शैलक्ष भोईर, प्रदीप भोईर यांच्या निर्दशनास आले. त्यांनी तातडीने स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचत पाहणी करीत क. डों. म. पा. साथरोग आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात कळविले. घनकचरा विभागालादेखील कळवून फवारणीबाबत सूचना केल्या. गेल्याच आठवड्यातदेखील पाच ते सहा बगळे मृत पावल्याचे स्थानिकाचे म्हणणे होते. संदर्भीत परिसरानजीक पाणथळ जागा व पुढे शेतीची जागा नदीतीर, खाडीतीर असल्याने विविध पक्षाचा या परिसरात वावर असतो. पाणथळ जागेतील चिखलातील कटीक, किडे हे पक्षाचे आवडते अन्न असल्याने पक्षी प्रेमीच्या दृष्टीकोनातून हा परिसर आवडीचे ठिकाण आहे.

आता बर्ड फ्ल्यूचे संकट पक्ष्यांवर

मनुष्य जीवावर कोरोनाच्या संकटानंतर आता बर्ड फ्ल्यूचे संकट पक्ष्यावर कोसळल्याचे समोर आले आहे. तर स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांनी यानिमित्ताने नागरिकांना सूचना केली आहे, की मृत पावलेले पक्षी आढळल्यास ते आम्हास कळवा. त्यास हात लावू नका. असे आढळल्यास याबाबत मनपाला कळवून योग्य ती दखल घेत काळजी घेतली जाईल.

नायलॉन व चिनी मांजा विक्रीवर दंडात्मक कारवाईची मागणी

महानगरपालिका क्षेत्रात पतंग उडवण्यासाठी नायलॉन आणि चिनी मांज्या मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. या मांज्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी गंभीर जखमीसह काही पक्षी मृत्यू पावत आहेत. त्यामुळे या अनधिकृतपणे मांज्या विकणाऱ्या दुकानादारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही इकोड्राइव्ह यंगस्टर फाउंडेशनच्या वतीने पालिका आयुक्ताकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर मांजा विक्री करणाऱ्या दुकानाचा परवाना तत्काळ रद्द करण्याची विनंतीदेखील संस्थेने केली असून पालिका आयुक्तांनी तत्काळ निवेदनावर कार्यवाही करून मृत प्राणी आणि पक्षांसाठी दफनभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती वजा मागणी इकोड्राइव्ह यंगस्टर फाउंडेशनचे महेश बनकर आणि अविनाश पाटील यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.