ETV Bharat / city

ठाण्यात पुन्हा एकदा सांडपाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 मजुरांचा मृत्यू - दोन कामगार गुदमरून मृत्यू मुंब्रा

ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची ( Two laborers death Mumbra thane ) घटना घडली आहे. मुंब्रा भागात कौसा स्टेडियमजवळील एका सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया टाकीची साफसफाई करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना काम करणे कामगारांच्या जिवावर बेतले आहे.

दोन कामगार गुदमरून मृत्यू मुंब्रा
Two laborers death Mumbra thane
author img

By

Published : Mar 30, 2022, 9:30 AM IST

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची ( Two laborers death Mumbra thane ) घटना घडली आहे. मुंब्रा भागात कौसा स्टेडियमजवळील एका सोसायटीच्या सांडपाणी प्रक्रिया टाकीची साफसफाई करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना काम करणे कामगारांच्या जिवावर बेतले आहे. आता या प्रकारानंतर चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी भुमिका पोलिसांनी घेतली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - ज्यूपिटर रुग्णालयात ऑपरेशनवेळी महिलेच्या पोटात राहिला कापडी मॉप; सर्जन, सहाय्यक सर्जन, भूलतज्ञासह नर्सवर गुन्हा

ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात टाकी साफ करताना कामगारांच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. याआधी रविवारी ठाण्यातील हरिनिवास सर्कलजवळील चार मजली इमारतीच्या टाकीची साफसफाई करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी मुंब्रा येथील कैसा स्टेडियमजवळील ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारात हनुमान विकांती कोरपकवड (वय २५) व सूरज राजू माधवी (वय २२, दोघे रा. डोंबिवली) सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी खाली उतरले होते.

सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दोघेही टाकीतून बाहेर न आल्याने सोसायटीतील लोकांनी खाली पाहिले. दोघेही कामगार बेशुद्ध अवस्थेत होते. दोघांनाही तातडीने जवळच्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मजुरांना मृत घोषित केले. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुरवातीला अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करून तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नौपाड्यात अजूनही गुन्हा दाखल नाही : रविवारी दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर अद्याप कोणताही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नसून, यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - ठाण्यातील वीज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.