ETV Bharat / city

नवी मुंबई : द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे अपघात

author img

By

Published : May 17, 2020, 5:14 PM IST

मिनी बसमधील 7 जखमी प्रवाशांना जवळच्या एम. जी. एम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून यातील 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

कळंबोली
कळंबोली

नवी मुंबई - कर्नाटक येथून प्रवाशी घेऊन येणाऱ्या खासगी बसने कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे महामार्गावर बंद पडलेल्या बसला मागून धडक दिल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

नवी मुंबई

सायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे एका खासगी प्रवासी मिनी बसचा अपघात झाला. कर्नाटकमधून खासगी मिनी ट्रॅव्हल बस (केए 51 एए 2013) मधून सात प्रवासी हे मुंबईच्या दिशेने निघाले होते. ही बस सायन-पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे आली असता, महामार्गावर डाव्या बाजूला खासगी बस (एमएच 04 जी 9251) बंद अवस्थेत उभी होती. यावेळी मुंबईच्या दिशेने चाललेल्या मिनी बसने बंद बसला मागून जोरदार धडक दिली.

नवी मुंबई

महामार्गावर बंद पडलेल्या बसचा अंदाज न आल्याने मिनी बसमधील चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने ही घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या मिनी बसमधील 7 जखमी प्रवाशांना जवळच्या एम. जी. एम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून यातील 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

या मिनीबसमधील लोक कर्नाटकवरून मुंबईला कशासाठी येत होते? आणि ते अनधिकृतपणे येत होते का? किंवा त्यांच्या जवळ पास होता का? याची चौकशी आता कामोठे पोलीस ठाणे करीत आहे. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाची धडपड सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.