ETV Bharat / city

खंडणीच्या गुन्ह्यात दोघांना अटक, १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२१ रोजी दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटीची खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर कोपरी पोलिसांनी गुन्ह्यातील संजय पुनमीया आणि सुनील जैन यांना अटक केली.

author img

By

Published : Aug 8, 2021, 2:31 AM IST

Updated : Aug 8, 2021, 2:37 AM IST

Two arrested for ransom case in thane
Two arrested for ransom case in thane

ठाणे - ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२१ रोजी दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटीची खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर कोपरी पोलिसांनी गुन्ह्यातील संजय पुनमीया आणि सुनील जैन यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोपरी पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात दोघांना अटक

ठाणे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे यांच्यासह सहा आरोपींवर कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यातील आरोपी संजय पुनमीया आणि सुनील जैन यांना कोपरी पोलिसांनी मुंबईमधून अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी पुनमीयाचा न्यायालयात उपचारासाठी अर्ज -

शनिवारी कोपरी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील संजय पुनमीया आणि सुनील जैन यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा ठाणे न्यायालयात पुनमीयाचे वकील दिलीप शुक्ला यांनी सांगितले की, संजय पुनमीया यांना मणक्याचा त्रास असून अटक होण्यापूर्वीच त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. जेजे रुग्णालयाने त्यांना बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. त्यानुसार उपचारासाठी अर्ज न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असून १२ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वकील दिलीप शुक्ला यांनी सांगितले.

Last Updated : Aug 8, 2021, 2:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.