ETV Bharat / city

VIDEO: चिमुकल्या प्रयाणची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, अफाट बुद्धिमत्ता पाहून व्हाल चकित

author img

By

Published : Mar 31, 2022, 10:08 AM IST

Updated : Mar 31, 2022, 12:28 PM IST

ठाण्यातील चिमुकल्या प्रयाणचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. प्रयाणची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे. त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे. केवळ अडिच वर्षांचा लहागा प्रयाण जगातील २७ ऐतिहासिक स्थळे व त्यांची माहिती, जिल्हे, राजधानी, भाज्या, फुले ओळखणे, राष्ट्रगीत हे सगळे अचूकपणे सांगतो.

Prayan Sonkusare india book of record
प्रयाण सोनकुसरे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

ठाणे - जगातील २७ ऐतिहासिक स्थळे व त्यांची माहिती, जिल्हे, राजधानी, एक ते १०० इंग्रजी अंक, फळे, भाज्या, फुले ओळखणे, राष्ट्रगीत हे सगळे अचूकपणे अडीच वर्षाचा ठाण्यातील एक मुलगा सांगतो. हे वाचून खरे वाटत नाही ना! ही गोष्ट आहे ठाण्यात राहणाऱ्या प्रयाण सोनकुसरे याची. ज्या वयात नीट बोलता येत नाही, त्या वयात एवढी माहिती सांगणे म्हणजे अजबच. चिमुकल्या प्रयाणच्या या बुद्धिमतेची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे.

माहिती देताना प्रयाणचे आई - वडील

हेही वाचा - आंबिवली रेल्वे स्थानकात फेरीवाल्याकडून पोलिसाला बेदम मारहाण

प्रयाण सोनकुसरे याची बुद्धिमत्ता अफाट आहे. तो समोरच्याला त्याच्या बुद्धिमत्तेने अचंबित करतो. जिल्हे, राजधानी आदींबरोबरच ४० प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, मराठी अंक ओळख, विविध ११ शोधकर्ते त्यांची नावे व काम, २७ स्वातंत्र्य सैनिकांची नावे, इंग्रजी अक्षरे ओळखणे, ४४ देशांचे नकाशे व त्यांची वैशिष्ट्ये प्रयाण अचूक सांगतो. त्याच्या या गुणांची दखल इंडिया बुक ऑफ रेकार्डने घेतली असून, त्याचे नाव रेकॉर्डवर घेतले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रयाणला प्रशस्तिपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

लॉकडाऊनचा फायदा

प्रयाण १५ महिन्यांचा होता तेव्हापासूनच त्याला फोटो बघून माणसे ओळखण्याची कला अवगत झाल्याचे त्याची आई श्रुती यांनी सांगितले. लहानपाणापासून छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करायची त्याला सवय होती. त्यामुळे, त्याचा अभ्यास हा त्याप्रमाणे घ्यायला सुरुवात केली. हे असतानाच त्याच्या प्रगतीवरही लक्ष ठेऊन होतो. त्यात तो लवकर प्रगती करताना दिसला. लॉकडाऊनचाही आम्ही या बाबतीत चांगला उपयोग करून घेतला आणि त्याला आम्ही शिकवत गेलो. त्याने अशीच पुढे प्रगती करावी, असे प्रयाणच्या आई वडिलांनी सांगितले.

प्रयाणचे सर्वांना कौतुक

प्रयाणचे वडील सुहेल व आई श्रुती सोनकुसरे हे उच्चशिक्षित आहेत. ते मूळचे नागपूरचे, परंतु सध्या ठाण्यात राहतात. प्रयाणचे शालेय शिक्षणही सुरू झालेले नाही, तरी एवढी माहिती त्याने आत्मसात केली आहे. याबाबतची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सुरू आहे आणि सगळ्यांकडून या चिमुकल्याची व्हा व्हा होत आहे.

हेही वाचा - Police Quarters Thane : पोलिसांच्या 700 कुटुंबियांना घर खाली करण्याचे निर्देश; जायचे कुठे? पोलिसांचा सवाल

Last Updated : Mar 31, 2022, 12:28 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.