ठाणे - मुंबई - नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने कंटेनर जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर रेल्वे रुळालगत कोसळला ( Truck Crash in Kasara Ghat ). आणि काही क्षणात भरधाव रेल्वे रुळावर धावत आली. ट्रक रुळाच्या बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला.
मोठा अनर्थ टळला -
भरधाव ट्रक क्रमांक. MH 15 EV 9826 हा घाटाचे संरक्षक कठडे तोडून दोनशे ते अडीचशे फूट दरीत कोसळून रेल्वे रूळालगत जाऊन कोसळल्या. मात्र अपघातावेळी चालकाने उडी मारल्याने तो बचावला असून कंटेनर (ट्रक) चा मात्र पूर्ण चक्काचूर झाला आहे. तर अपघातग्रस्त ट्रक रेल्वे मार्गांवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ट्रकचा पूर्ण चेंदा मेंदा -
मुंबईहून नाशिककडे जात असता ट्रक चालक अनिल श्रीकृष्ण रोडे. (रा.बीड ) हा आज सकाळच्या सुमारास कसारा घाट चढत होता. यावेळी हिवाळा ब्रिजच्या अलीकडील वळणावर एका अज्ञात वाहणाने ओव्हर टेक करते वेळी हूल दिली. त्यामुळे ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कोळशाने अर्धवट भरलेला ट्रक थेट दरीत कोसळला. या दरम्यान वाहनचालक अनिल रोडे यांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेत आपला बचाब केला पण ट्रक थेट दरीत जाऊन रेल्वे बोगद्याच्या कथड्याला अडकला. मात्र ट्रकचा पूर्ण चेंदा मेंदा झाला. ट्रक दरीत गेल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, महामर्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस, टोल यंत्रणा 1033 च्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरीत उतरले आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य -
खोल दरीत गेलेल्या ट्रकमध्ये कोणी अडकलेय का ? हे बघण्यासाठी व अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे,अक्षय राठोड,विनोद आयरे,स्वप्नील,बाळू मांगे ,महामार्ग् पोलीस कर्मचारी विटकर हे 250 फूट खोल दरीत उतरले होते. आपघातग्रस्त ट्रक व परिसरात् शोध घेतल्यावर कोणत्याही प्रकारे जखमी वैगरे आढळले नाही. ट्रकचा चालक सुखरूप असल्याने त्याला कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच खोल दरीत उतरून मदत कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन टीमचे पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.
आणि अनर्थ टळला -
ट्रकचा अपघात खूप भीषण होता. हा ट्रक कसारा घाटाच्या 300 फूट खोल दरीलगत रेल्वे मार्ग आहे. ह्या रेल्वे मार्गांवरुन नाशिक मुंबई रेल्वे सेवा सुरु असते आज सकाळी जो ट्रक दरीत कोसळला तो मोठ्या वेगात खाली दरीत कोसळला होता. दरीत कोसळलेला ट्रक रेल्वे ट्रॅक मार्गांवर वर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकल्याने पुढील अनर्थ टळला. जर अजून एक फूट जरी ट्रक पुढे गेला असता तर तो रेल्वे ट्रक वरच पडला असता. विशेष म्हणजे आपघात झाल्यावर 10 मिनिटांनी या रेल्वे ट्रकवरून मुंबईकडे मेल एक्सप्रेस रवाना झाली होती .जर मेल एक्सप्रेस व अपघाताची वेळ सारखीच झाली असती तर रेल्वे च्या कम्पनानं मुळे ट्रक थेट रेल्वे वर सुद्धा कोसळला असता व मोठी जीवितहानी झाली असती दरम्यान या प्रकरणी कसारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा - Sairat Incidence in Miraj : मिरजेत सैराटचा थरार; प्रेमविवाह केलेल्या तरुणावर हल्ला