ETV Bharat / city

कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला पालिका प्रशासन बळी; परिवहन कर्मचाऱ्यांचे पुन्हा ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Sep 8, 2020, 7:41 PM IST

कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. या महापालिकेची परिवहन सेवा खासगी तत्वावर चालवण्यात येत असून, याचा ठेका भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला १ ऑगस्ट २०१९ रोजी दिला आहे.

agitation
परिवहन कर्मचाऱ्यांचे पुन्हा ठिय्या आंदोलन

मीरा भाईंदर(ठाणे) - अत्यावश्यक्त काळात ठप्प असलेली परिवहन सेवा पुन्हा सुरू होण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात आली आहे. प्रशासनाने कंत्राटदाराला २ कोटी रुपये देयके देऊन देखील कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना पगार उपलब्ध करून दिलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गोंधळात कंत्राटदाराने अजून पैशांची मागणी केली असून, पालिका प्रशासन राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्याला पैसे उपलब्ध करून देण्याचा घाट रचत आहे. गेल्या सहा महिन्यांचा पगार अद्याप दिला नसल्याने कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. या महापालिकेची परिवहन सेवा खासगी तत्वावर चालवण्यात येत असून, याचा ठेका भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला १ ऑगस्ट २०१९ रोजी दिला आहे. पालिकेच्या सेवेत एकूण ७४ बसगाडया असून यापैकी ५ गाडया वातानुकुलीत आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवा चालविण्याकरिता ठेकेदारास प्रति किमी ४२ रुपये याप्रमाणे मोबदला देत आहे. यामुळे प्रवाशांच्या सोईकरिता महानगरपालिकेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या साथीमुळे परिवहन सेवा ठप्प ठेवण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून ठेकेदाराला दोन टप्प्यात साधारण २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, तरी देखील ठेकेदाराकडून ९० टक्के कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार न दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याव्यतिरिक्त कंत्राटदाराने अधिक कोट्यवधी रुपयांची मागणी केली असून, त्याद्वारे कर्मचाऱ्यांना पगार उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. परंतु, कंत्राटदाराच्या प्रत्येक मागणीला पालिका प्रशासन बळी का पडत आहे? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

परिवहन ठेकेदाराला २ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत १६ वेळा पत्र लिहून पाठवली आहेत. परिवहन सेवेचे कर्मचारी हे मनपा प्रशासनाचे कर्मचारी नसून, ठेकेदारांचे आहेत. टाळेबंदीमध्ये ज्या बस बंद होत्या त्या बिलाची मागणी करत आहे, तर ते प्रशासन देऊ शकत नाही. वारंवार सूचना देऊनही ठेकेदार बस चालू करत नाही. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना पगार देत नाही. त्यामुळे विधी विभागाची मदत घेऊन लवकरच प्रशासनाकडून ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.