ETV Bharat / city

Train Accident : चूक जीवावर बेतली; रेल्वे रुळांवर हेडफोन शोधतांना लोकलची धडक, एक जण ठार - ठाणे अपघात

रेल्वे रुळावर पडलेले हेडफोन शोधतांना दोन जणांना अंबरनाथ लोकलने जोरदार धडक ( Ambernath local ) दिली. यात एका जणाचा जागीच मृत्यू ( One died ) झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Dombivli railway station
डोंबिवली रेल्वे स्थानक
author img

By

Published : Jun 24, 2022, 3:55 PM IST

ठाणे - रेल्वे रुळावर पडलेले हेडफोन शोधतांना दोन जणांना अंबरनाथ लोकलने जोरदार धडक ( Ambernath local ) दिली. यात एका जणाचा जागीच मृत्यू ( One died ) झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोकलच्या दरवाज्याजवळ प्रवास करताना हेडफोन पडल्याने दोघे मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. ते पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत असतांना कोपर-डोंबिवली स्थानकांदरम्यान दोघांनाही लोकलची धडक बसली. या अपघातात 16 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदराजा हैदरअली शेख (16) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. तर, सादिक शेख (17) हा या अपघातातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुंब्र्यात राहणारे हैदरअली, सादिक तसेच अन्य दोघे असे चार मित्र कल्याणहून मलंगगडावर दर्शनासाठी गेले होते. तेथून चौघे मित्र मुंब्र्याला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास लोकलमध्ये चढले. चौघेही रेल्वेच्या दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करत होते. लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर हैदरअलीचा हेडफोन रेल्वे रुळावर पडला होता. पडलेला हेडफोन घेण्यासाठी हैदरअली तसेच सादिक कोपर रेल्वे स्थानकात उतरले.

हैदरअली तसेच सादिक हेडफोन शोधण्यासाठी रुळवरून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालत निघाले होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अंबरनाथ लोकलची जोरकदार धडक बसली यात हैदरअली यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र सादिकच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - Shivsena Big Action : शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केला अर्ज, 'या' 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची केली मागणी

हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या पलायनाची माहिती अंगरक्षकांकडून कंट्रोल रूमला, दिलीप वळसे पाटलांवर टांगती तलवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.