ठाणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची ओढ लागली आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून भाविक वारकरी पंढरपूरला येत असतात अश्या वारकऱ्यांना टोल माफी ( Toll exemption for Warkaris ) देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी घेतला आहे. रविवारी पंढरपूर येथे विठ्ठलाची ( Vitthal Tempal Pandharpur ) मोठी यात्रा संपन्न होणार असून वारकरी ( Warkaris ) बांधवांच्या त्या वाहनांना स्टिकर्स वाटप करा असे निर्देश बुधवारी शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत दिले. याचदरम्यान अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा अशी सूचनाही शिंदे यांनी यावेळी केली.
पंढरपूरात गर्दी वाढणार - बुधावरी आषाढी निमित्त एक बैठक बोलावली होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना टोल माफीची घोषणा केली आहे. तसेच आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेली दिंडी पुन्हा सुरू झाली असून यावर्षी पंढरपूरात गर्दी वाढणार आहे. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. अशा सूचनाही केल्या.
आतापासूनच व्यवस्था- शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा.
पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था- चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करा. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या असे ही म्हटले आहे.
मुख्यमंत्रयांची मानुसकी - आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मोठी गर्दी झाल्याने या गर्दीत धक्काबुक्की झाल्याने एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली लागलीच तिची विचारपूस करत मुख्यमंत्र्यांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देत तात्काळ उपचार करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि तिची विचारपूस देखील केली.
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, त्यांचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी कार्यवाही करण्यात यावी. शासन-प्रशासन आपल्या दारात आले अशी भावना लोकांमध्ये पोहोचायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वीज पुरवठा अखंडित राहण्यासाठी सज्ज रहा - आढावा बैठक सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी परिसरातील वीजपुरवठा हा अखंडित आणि सुरळीत राहील याकडे लक्ष देऊन सज्ज राहण्याचे निर्देश दिले. तसेच लोकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची २४ बाय ७ व्यवस्था करा. त्यावर कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरवण्यात यावे असे देखील निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा - Municipal Corporation Election 2022 : महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची लागणार कसोटी तर भाजपपुढे आव्हान